विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतली शरद पवार यांची भेट !

डावीकडून शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस

मुंबई – माजी मुख्यमंत्री आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ३१ मे या दिवशी मुंबईतील ‘सिल्वर ओक’ येथे जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. ही भेट १० मिनिटांची होती. देवेंद्र फडणवीस यांनी याविषयी ‘ट्वीट’द्वारे माहिती दिली असून ही सदिच्छा भेट असल्याचे त्यांनी म्हटले आहे. असे जरी असले, तरी या भेटीनंतर राजकीय चर्चेला वेग आला आहे.