…तर निर्बंध अधिक कडक केले जातील ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

कोरोनाचे संकट अद्यापही टळलेले नाही, असे असतांना मी मेट्रोच्या कार्यक्रमाला जातांना रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी दिसली. ही चिंताजनक गोष्ट आहे. नागरिकांनी असाच मुक्त संचार चालू केला, तर निर्बंध अधिक कडक केले जातील, अशी चेतावणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.

राष्ट्राचा आधार होण्यासाठी स्वत:तील असामान्यत्व ओळखा ! – निरंजन चोडणकर, युवा संघटक, हिंदु जनजागृती समिती

छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे स्वराज्यावरचे आक्रमण, हे स्वत:वरील आक्रमण आहे, असे समजून लढले. आज आपल्यालाही देव, देश आणि धर्म यांवरील आक्रमण म्हणजे स्वत:वरील आक्रमण आहे, असे वाटले पाहिजे. आज मंदिर रक्षण, गोरक्षण, लव्ह जिहाद यांसारख्या समस्यांच्या विरोधात वैध मार्गाने विरोध करायला हवा.

लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर आणि प्रकाशक यांच्यावर तात्काळ गुन्हा नोंद करावा !

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आक्षेपार्ह लिखाण केल्याचे प्रकरण, अंबरनाथ-बदलापूर येथील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या युवा विभागाची तहसीलदारांकडे मागणी !

शिवसेनेचे आमदार प्रदीप जैस्वाल यांना न्यायालयाकडून ६ मासांची शिक्षा !

वर्ष २०१८ मध्ये शहरात झालेल्या हिंदु-मुसलमान जातीय दंगलीच्या वेळी सरकारी कामात अडथळा आणल्याच्या प्रकरणी येथील शिवसेनेचे आमदार प्रदीप जैस्वाल यांना जिल्हा सत्र न्यायालयाने ६ मासांची शिक्षा आणि ५ सहस्र रुपये दंड ठोठावला आहे.

पुस्तकावर संपूर्ण देशात बंदी घालण्याच्या मागणीसाठी राजे प्रतिष्ठान दुर्गसंवर्धन विभागाचेही निवेदन !

गिरीश कुबेर यांच्या पुस्तकावर महाराष्ट्र्रातच नव्हे, तर संपूर्ण देशात बंदी घालावी, असे निवेदन कल्याण येथील राजे प्रतिष्ठान दुर्गसंवर्धन विभागाच्या वतीने कल्याण पूर्व येथील कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शाहूराजे साळवे आणि कल्याणचे तहसीलदार श्री. दीपक आकडे यांना दिले.

तराफा दुर्घटनेप्रकरणी १०० हून अधिक कर्मचार्‍यांचे जबाब नोंदवले !

तौक्ते चक्रीवादळात तराफा बुडाल्याच्या दुर्घटनेप्रकरणी पोलिसांनी १०० हून अधिक कर्मचार्‍यांचे जबाब नोंदवले, तसेच तराफ्याशी संबंधित आस्थापनाच्या कर्मचार्‍यांची चौकशी पोलिसांनी चालू केली आहे.

अमली पदार्थविरोधी पथकाने घरात काम करणार्‍या दोघांना घेतले कह्यात

अभिनेता सुशांतसिंह राजपूत यांच्या आत्महत्येप्रकरणी अमली पदार्थविरोधी पथकाने ३० मे या दिवशी सुशांतसिंह यांच्या घरात काम करणारे केशव आणि नीरज या दोघांना अन्वेषणासाठी कह्यात घेतले आहे.

केवळ ९० दिवस !

उद्या ९० दिवसांनंतर गुप्तचरांच्या अहवालात जर ‘कोरोनाची निर्मिती चीनने केली’, अशी पुराव्यांसह माहिती समोर आली, तर चीनचे पाऊल काय असू शकते ? हे लक्षात येते. चीनने जैविक महायुद्ध चालू केले आहे…

अमरावती येथे रवींद्र वैद्य यांनी अन्नछत्राद्वारे लाखो लोकांची भूक भागवली !

कोरोनाच्या संकटकाळात शहरातील महादेव खोरी परिसरातील ‘वर्‍हाड’ या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रवींद्र वैद्य यांनी पुढाकार घेत अनेकांच्या भोजनाची व्यवस्था केली आहे.

शुल्क न भरलेल्या विद्यार्थ्यांना दाखला दिल्याप्रकरणी वॉलनट शाळेची चौकशी होणार !

चौकशी करून शाळेला सूचना करण्याच्या आदेशाचे पत्र आयोगाने शिक्षण उपसंचालकांना दिले. शिक्षण हक्क कायद्यातील तरतुदींचा भंग केल्याने आयोगाने कार्यवाही केली.