ब्राझिलचे राष्ट्राध्यक्ष जैर बोल्सोनारो यांनी सार्वजनिक ठिकाणी मास्क न घातल्याने ७ सहस्र ३०० रुपयांचा दंड !

भारतात अशी कारवाई कधीच होऊ शकत नाही, असेच जनतेला वाटेल !

राष्ट्राध्यक्ष जैर बोल्सोनारो

ब्रासिलिया (ब्राझिल) – ब्राझिलचे राष्ट्राध्यक्ष जैर बोल्सोनारो यांनी त्यांच्या समर्थकांच्या सभेमध्ये सहभागी होतांना मास्क घातला नव्हता आणि मोठी गर्दी जमवली होती. त्यामुळे कोरोना प्रतिबंधाचे नियम मोडल्यावरून त्यांना १०० डॉलर्सचा (७ सहस्र ३०० रुपयांचा) दंड भरावा लागला. साओ पाऊलो येथे ही घटना घडली.