यंदाही हज यात्रेला अन्य देशांतील नागरिकांना येण्यास सौदी अरेबियाकडून बंदी !

असे आहे, तर केरळमधील हज यात्रेकरूंना प्राधान्याच्या सूचीत घेऊन त्यांना कोरोनाची लस देण्याचा निर्णय केरळ सरकार रहित करील का ?

रियाध (सौदी अरेबिया) – कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर यंदाच्या वर्षीही हज यात्रेला अन्य देशांतील नागरिकांना मक्केत येण्यास सौदी अरेबियाकडून बंदी घालण्यात आली आहे. यंदा या यात्रेला सौदी अरेबियातीलच ६० सहस्र नागरिकांना उपस्थित रहाण्याची अनुमती देण्यात आली आहे. यातही १८ ते ६५ वर्षे वयोगटातील नागरिकांनाच जाता येणार आहे. मागील वर्षी तर केवळ १ सहस्र लोकांनाच या यात्रेला उपस्थित रहाण्याची अनुमती देण्यात आली होती. हज यात्रा यंदा १७ ते २२ जुलै २०२१ या कालावधीत आहे. हज यात्रेसाठी जगभरातून २० लाख मुसलमान मक्केत येतात.