अलगीकरणाचे नियम न पाळल्याने पाकने भेट म्हणून पाठवलेले आंबे स्वीकारण्यास अनेक देशांचा नकार !

पाकची जगभरात नाचक्की ! ‘पाकची आतंकवादी वृत्ती पहाता तो आंब्यांच्या नावाखाली बॉम्ब पाठवण्याच्या भीतीमुळे तर या देशांनी पाकचे आंबे स्वीकारण्यास नकार दिला नाही ना ?’, असे कुणाला वाटल्यास चूक काय ?

इस्लामाबाद – अलगीकरणाचे नियम न पाळल्याने पाकने भेट म्हणून पाठवलेले आंबे स्वीकारण्यास अमेरिका आणि चीन यांच्यासह अनेक देशांनी नकार दिला आहे. अन्य देशांची जवळीक साधण्यासाठी पाकने जगभरातील ३२ देशांना पाकमध्ये पिकणारे ‘चौंसा’ जातीचे आंबे भेट म्हणून पाठवले होते. पाकचा ‘घनिष्ठ’ मित्र असलेल्या चीननेही मित्रराष्ट्राचे आंबे स्वीकारण्यास नकार दिल्याने पाक तोंडावर आपटला आहे. यासह कॅनडा, नेपाळ आदी देशांनीही पाकचे आंबे स्वीकारण्यास नकार दिला.