पुणे – ऑक्सिजनची उपलब्धता, पुरवठा आणि नियंत्रण यांसाठी उपयुक्त अशा २ अॅप्सची निर्मिती पुणे जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आली आहे. या अॅप्सचे लोकार्पण पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
ऑक्सिचेन व ऑक्सिवीन ॲपचे अजित पवारांच्या हस्ते लोकार्पण https://t.co/fpw3hU40PE #Oxygen #Coroanvirus #Pune
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 11, 2021
कोरोनाच्या दुसर्या लाटेमध्ये लोकांना ऑक्सिजनच्या पुरवठ्याची मोठी आवश्यकता भासत होती; पण तेव्हा ऑक्सिजनची पुरेशी उपलब्धता नसल्याने काही रुग्णांना प्राण गमवावे लागले होते. हा अनुभव लक्षात घेऊन जिल्हा प्रशासन, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि हिराबाई बुटाला विचार मंच यांच्या सहकार्याने ऑक्सिचेन आणि ऑक्सिविन हे २ नवीन अॅप्स सिद्ध केले आहेत. यामध्ये ऑक्सिजन पुरवठा साखळी व्यवस्थित करण्यासाठी तसेच मागणी पुरवठ्याचा अंदाज घेण्यासाठी ऑक्सिचेन या अॅपचा उपयोग होईल, तर ऑक्सिविन अॅपमध्ये ऑक्सिजन सॅच्युरेशनवर आधारित माहिती ३ रंगांच्या श्रेणीमध्ये दिसेल.