उडुपी (कर्नाटक) येथे धर्मांधांकडून शेजारील हिंदूच्या गायीची चोरी करून हत्या !

  • शेजारी कोणत्या मानसिकतेचे लोक रहातात आणि भविष्यात ते जिवालाही धोका निर्माण करू शकतात, याचा विचार करून हिंदूंनी स्वरक्षणासाठी नेहमीच सिद्ध रहायला हवे, हेच ही घटना दर्शवते !
  • अशा घटनांविषयी निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !

उडुपी (कर्नाटक) – येथील इब्राहिम नावाच्या एका व्यक्तीने शेजारील यमना गंगाधर यांची गाय चोरी करून तिची स्वतःच्या घरात हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. सीसीटीव्हीच्या चित्रीकरणातून ही घटना समोर आली. घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतूनही प्रसारित झाला. यानंतर गंगाधर यांनी पोलिसांत तक्रार नोंदवल्यावर इब्राहिमला अटक करण्यात आली आहे. इब्राहिम याने गोहत्या केल्यानंतर गोमास स्थानिक बाजारात जाऊन विकल्याचे उघड झाले.