राज्यघटनेच्या प्रस्तावनेतील ‘धर्मनिरपेक्ष’ शब्द काढून तेथे ‘हिंदु राष्ट्र’ लिहा ! – प.पू. स्वामी आनंद स्वरूप महाराज

शंकराचार्य परिषदेकडून भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करण्यासाठी महाअभियान प्रारंभ

तमिळनाडूमधील द्रमुक सरकार हिंदूंच्या ३६ सहस्र मंदिरांत ब्राह्मणेतर पुजार्‍यांच्या नियुक्त्या करणार !

हिंदूंच्या मंदिरांत कोण पुजारी असणार, हे सरकार कसे ठरवते ? मशिदीमध्ये कोण इमाम आणि मौलवी असणार किंवा चर्चमध्ये कोण पाद्री असणार, हे सरकार कधी ठरवते का ?

उत्तरप्रदेशातील ‘कोरोनामाता मंदिर’ अज्ञातांनी पाडले !

अशा प्रकारचे मंदिर बांधले जात असतांना हिंदूंचे संत, महंत, धर्माचार्य, हिंदुत्वनिष्ठ संघटना, नेते यास वैध मार्गाने विरोध करत नाहीत किंवा हिंदूंचे प्रबोधनही करत नाहीत, हे अपेक्षित नाही !

विदेशी कलाकारांमध्ये ‘अनुगच्छतु प्रवाह’ हा संस्कृत शब्द अंगावर ‘टॅटू’ म्हणून गोंदवून घेण्याची चढाओढ !

कुठे संस्कृतकडे आकर्षित होणारे पाश्‍चात्त्य कलाकार, तर कुठे इंग्रजीची गुलामी करणारे बहुतांश भारतीय कलाकार !

नव्या ‘रोस्टर’च्या विरोधात अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपिठातील अधिवक्त्यांचा आज न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार !

असोसिएशनचे म्हणणे आहे की, सरन्यायाधिशांनी ‘रोस्टर’ परत घेण्यासाठी समितीच्या आवाहनाकडे दुर्लक्ष केले. यामुळे अधिवक्ते संतप्त आहेत.

गुजरातमध्ये काळ्या बुरशीचा संसर्ग झालेल्या रुग्णांवर आयुर्वेदीय उपचार ठरत आहेत परिणामकारक !

७० रुग्णांपैकी एकाचाही मृत्यू नाही कि डोळे काढावे लागले नाहीत !

पिरंगुट येथील आग दुर्घटनेतील मृत व्यक्तींच्या नातेवाईकांचा मागण्या मान्य न झाल्यास मृतदेह घेण्यास नकार !

मृतांचे नातेवाईक या मागण्यांसंदर्भात उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांनाही भेटणार आहेत, तसेच मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर नातेवाइक आणि संघटना आमरण उपोषणाला बसणार, अशी चेतावणीही त्यांनी दिली आहे.

कुर्डी (सांगे) येथे कबरीच्या भोवती नव्याने केलेल्या बांधकामावरून सामाजिक माध्यमांत चर्चेला उधाण !

प्रार्थनास्थळांचा हळूहळू विस्तार करून नंतर ते अधिकृत असल्याचे भासवत प्रशासनाला वाकवणे, ही पद्धत धर्मांधांकडून सर्वत्र वापरली गेली आहे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘देव सर्वत्र आहे, प्रत्येकात आहे’, ही हिंदु धर्माची शिकवण असल्यामुळे हिंदूंना इतर धर्मियांचा द्वेष करायला शिकवले जात नाही. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले