कोरोनाग्रस्त मृतदेहांच्या खिशातून भ्रमणभाष आणि दागिने यांच्या चोरीच्या घटनांत वाढ !

कोरोनाच्या संसर्गानंतर मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीच्या खिशातील पैसे, दागिने, घड्याळ, भ्रमणभाष चोरी झाल्याच्या अनेक तक्रारी पोलीस ठाण्यात प्रविष्ट झाल्या आहेत. रुग्णालयात उपचाराच्या वेळी रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा मृतदेह प्लास्टिकच्या पिशवीत घालतांना त्याच्या ….

उजनी धरणातून सोलापूरसाठी भीमानदीत सोडण्यात आले पाणी

सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणार्‍या स्रोतांपैकी एक असलेल्या औज बंधारा कोरडा पडला असून टाकळी बंधार्‍यात सध्या सोलापूर शहराला पुढील १५ दिवस पुरेल एवढा पाणीसाठा शेष आहे.

कुख्यात गुंड छोटा राजनची पुतणी कह्यात !

मी एका राजकीय पक्षाची जिल्हा अध्यक्ष आहे. छोटा राजनची पुतणी आहे. जीव प्यारा असेल तर ५० लाख रुपये दे, असे सांगत तिने त्या व्यक्तीला धमकावले होते.

पूर परिस्थिती टाळण्यासाठी नद्यांकाठची अतिक्रमणे हटवण्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांचे आदेश !

पुराविषयी वडनेरे समितीने सुचवलेल्या उपाययोजनांची कार्यवाही करावी अशा सूचना जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी जलसंपदा विभागाला दिल्या आहेत. पुण्यातील सिंचन भवन येथे कृष्णा-भीमा खोर्‍यातील नद्यांना पावसाळ्यात येणारा पूर आणि धरणांचा आढावा घेण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते.

कोल्हापूर जिल्ह्यातील पूर परिस्थिती टाळण्यासाठी धरणातील पाण्याचे आधीच नियंत्रण ! – दौलत देसाई, जिल्हाधिकारी, कोल्हापूर 

दोन वर्षांपूर्वी आलेल्या पूर परिस्थितीचा अभ्यास करून मागील वर्षी धरणाच्या पाण्याचे आधीच नियंत्रण केले होते. यावर्षी त्याच पद्धतीने संभाव्य पूर नियंत्रणाचे नियोजन सर्व विभागांच्या समन्वयाने केले असल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.

कोरोनाची तिसरी लाट आल्यास उपचारांसाठी ३०० हून अधिक खाटांची व्यवस्था ! – राजेश पाटील, आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका

कोरोनाची तिसरी लाट आल्यास महापालिका प्रशासनाने लहान मुलांकरिता वाय.सी.एम्. रुग्णालयामध्ये १५० ऑक्सिजन बेड, ३० आयसीयू बेड आणि जिजामाता रुग्णालयात १५० खाटांची व्यवस्था केली आहे.

कोरोना : जनतेला भोगाव्या लागणार्‍या यातनांना कारणीभूत कोण ?

‘अशा आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी भगवंताचे भक्त बना आणि साधना वाढवा. अन्य कुणीही नाही, तर भगवंतच वाचवील !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले एका साधकाला कोरोनाची लागण झाल्यावर रुग्णालयात भरती केले असतांना त्याला तेथे आणि सरकारी यंत्रणा यांच्याविषयी आलेले कटू अनुभव ! महाराष्ट्रातील एका साधकाला कोरोनाची लागण झाली असतांना त्याला उपचारासाठी महानगरपालिकेचे रुग्णालय आणि कोविड केअर … Read more

रासायनिक खतांची किंमत कमी करा ! – धैर्यशील माने, खासदार, शिवसेना

खतांच्या किंमत ८०० रुपयांनी वाढ झाली आहे. शेतीची कामे जरी चालू असली, तरी बाजारपेठा बंद असल्याने शेतकर्‍यांची परिस्थिती हालाखीची आहे. त्यामुळे रासायनिक खतांची किंमत कमी करावी, अशी मागणी धैर्यशील माने यांनी रासायनिक आणि खते मंत्री डी.व्ही. सदानंद गौडा यांच्याकडे केली आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींकडून खंडपिठाचे सलग साडेबारा घंटे कामकाज

८० प्रकरणांवर सुनावणी ! प्रलंबित खटल्यांविषयी न्यायालय आणि केंद्रशासन यांनी धोरणात्मक निर्णय घेऊन त्यांचा निपटारा केल्यास खर्‍या अर्थाने ‘न्यायदान’ ही संकल्पना सार्थकी ठरेल !

ढासळलेल्या अर्थव्यवस्थेचे किंवा चीनच्या घुसखोरीचे दायित्व कुणीच स्वीकारत नाही ! – डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी, भाजपचे नेते

वर्ष २०१६ पासून अर्थव्यवस्था कोलमडत चालल्याविषयी, तसेच लडाख भागात चीनकडून होत असलेली घुसखोरी रोखण्यात अपयश आल्याविषयी कुणीही दायित्व स्वीकारत नाही.