गुंडगिरी करणार्या गुंडाच्या नातेवाइकांना कह्यात घेऊन आजन्म कारावासाची शिक्षा द्यायला हवी !
पुणे – कुख्यात गुंड छोटा राजनची पुतणी प्रियदर्शनी निकाळजे हिने मागील वर्षी एका व्यक्तीकडे ५० लाख रुपयांची खंडणी मागितली होती. मी एका राजकीय पक्षाची जिल्हा अध्यक्ष आहे. छोटा राजनची पुतणी आहे. जीव प्यारा असेल तर ५० लाख रुपये दे, असे सांगत तिने त्या व्यक्तीला धमकावले होते. या प्रकरणाची तक्रार आल्यानंतर धीरज साबळे यांना २५ लाख रुपयांची खंडणी स्वीकारतांना, तर मंदार वाईकर यांना चौकशीअंती अटक केली होती. या संपूर्ण प्रकरणातील मुख्य आरोपी प्रियदर्शनी वानवडी परिसरात येणार असल्याची माहिती मिळाल्याने पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, साहाय्यक आयुक्त लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक बालाजी पांढरे आणि त्यांच्या खंडणीविरोधी पथकाने सापळा रचून तिला कह्यात घेतले.