नवी देहली – वर्ष २०१६ पासून अर्थव्यवस्था कोलमडत चालल्याविषयी, तसेच लडाख भागात चीनकडून होत असलेली घुसखोरी रोखण्यात अपयश आल्याविषयी कुणीही दायित्व स्वीकारत नाही. एवढेच नव्हे, तर कोरोनाच्या दुसर्या लाटेचा सामना करण्यासाठी उपाययोजना न केल्याविषयीचेही कुणी दायित्व स्वीकारले नाही, असे सांगत केंद्र सरकार कसलेच दायित्व स्वीकारत नसल्याची टीका भाजपचे नेते डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी ट्वीटद्वारे केली.
भारत एकटा पडण्याच्या मार्गावर !
The US and Russia have patched up their differences. An announcement will come soon. This making up has China’s support. That means India will be isolated. If this is depressing then ask EAM- he will give a spin that will make you complacent
— Subramanian Swamy (@Swamy39) May 20, 2021
डॉ. स्वामी ट्वीटमध्ये म्हणाले, ‘‘आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठ्या घडामोडी चालू आहेत. अमेरिका आणि रशिया यांनी आपापसांतील वितुष्ट मिटवले असून लवकरच याची घोषणा केली जाईल. याला चीननेही समर्थन दिले असून भारत आता एकटा पडण्याच्या मार्गावर आहे. हवे असेल, तर आपल्या परराष्ट्रमंत्र्यांना विचारा.’’