माजी आमदार विवेक पाटील यांच्यासह १९ जणांवर आरोपपत्र प्रविष्ट केले !

येथील कर्नाळा नागरी सहकारी बँकेतील ५२९ कोटी ३६ लाख ५५ सहस्र २६ रुपयांच्या कर्ज घोटाळ्याच्या प्रकरणी माजी आमदार विवेक पाटील आणि त्यांचा मुलगा अभिजित यांच्यासह १९ संचालक अन् मुख्य कार्यकारी अधिकारी यांना उत्तरदायी धरले आहे.

वारकरी संप्रदायातील प्रमुख कीर्तनकार ह.भ.प. भानुदास यादव महाराज यांचा देहत्याग !

ह.भ.प. यादव यांचा सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या प्रति विशेष स्नेह होता. २ डिसेंबर २००१ या दिवशी कोल्हापूर येथील सर्वसंप्रदाय सत्संगात सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या समवेत एक वक्ता म्हणून ते सहभागी झाले होते.

एवढेही लक्षात न येणारे रुग्णालयातील कर्मचारी ! अशांना शिक्षा करा !

‘‘चक्रीवादळाची भीषणता पहाता अशा लहानसहान घटना घडणारच. सुपर स्पेशालिटी विभागाच्या खिडक्या उघड्या ठेवल्यामुळे आत पाणी साचले.’’ – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

कढोली (जिल्हा नागपूर) येथील गावकर्‍यांनी ७० सहस्र रुपयांच्या वर्गणीतून गावातच उभारले ‘कोविड केअर सेंटर’ !

जी गोष्ट सर्व यंत्रणा हाताशी असणार्‍या प्रशासनाने करायला हवी, ती गोष्ट कढोली गावातील ग्रामस्थ करत आहेत. असे आहे, तर मग कोट्यवधी रुपये व्यय करून जनतेच्या पैशातून प्रशासनाचा पांढरा हत्ती पोसायचा कशाला ?

देशातील युवकांच्या मनात सावरकर यांच्या राष्ट्रभक्तीचे बीज पेरायला हवे ! – उदय माहुरकर

स्वातंत्र्यपूर्व काळात सावरकर यांचे विचार काँग्रेसने आणि देशाने ऐकले असते, तर त्या वेळी देशाची फाळणी झाली नसती.

कोरोनामुळे नाही, तर सरकारी कर्मचार्‍यांमुळे जनतेला यातना सहन कराव्या लागतात !

‘कोरोनाबाधित असल्याचे निदान झाल्यावर कळवा येथील सौ. हर्षा देवघरे, यांना आरोग्य व्यवस्थेच्या संदर्भात आलेले कर्मचारी अन् अधिकारी यांच्या उर्मटपणामुळे मनःस्ताप भोगावा लागला.’

‘म्युकरमायकोसिस’चे आव्हान !

कोरोनामुळे ‘म्युकरमायकोसिस’ या गंभीर आजाराने डोके वर काढले आहे. सध्या महाराष्ट्रात ८०० हून अधिक रुग्ण आढळले आहेत. ही आकडेवारी चिंताजनक असून प्रशासनापुढे एक नवे आव्हान उभे राहिले आहे.

एक ऐवजी १० आस्थापनांना लस बनवण्याचे परवाने द्या ! 

पुरवठ्यापेक्षा अधिक लस देण्याची मागणी होत असेल, तर अडचण येणारच आहे. लस उत्पादनासाठी सरकारने एका आस्थापनाऐवजी १० आस्थापनांना  मान्यता द्यावी. त्यांना देशात पुरवठा करू द्यावा आणि मग जेव्हा आपल्याकडे अतिरिक्त लसी येतील, तेव्हा ही आस्थापने परदेशात लसी निर्यात करतील.

अकोला येथील विदेही संत परमहंस श्री रामचंद्र महाराज यांचा देहत्याग !

श्रीक्षेत्र शेगाव पासून १५ कि.मी. अंतरावर असलेल्या श्रीक्षेत्र वझेगाव येथील विदेही संत परमहंस श्री रामचंद्र महाराज (वय ७३ वर्षे) यांनी १७ मे या दिवशी पहाटे देहत्याग केला.

पंतप्रधान निधीतून महाराष्ट्राला मिळालेल्या ४ सहस्र ४२७ पैकी ८७५ ‘व्हेंटिलेटर्स’ दुरुस्तीच्या कारणास्तव पडून !

‘व्हेंटिलेटर्स’च्या अभावामुळे राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांचे प्राण जात असतांना नादुरुस्त ‘व्हेंटिलेटर्स’ दुरुस्त करण्याविषयी प्रशासनाची उदासीनता अक्षम्य आहे. या प्रकरणाचे सखोल अन्वेषण होऊन दोषी अधिकार्‍यांवर कठोर कारवाई व्हायला हवी !