केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा केंद्र सरकारला सल्ला !
नवी देहली – पुरवठ्यापेक्षा अधिक लस देण्याची मागणी होत असेल, तर अडचण येणारच आहे. लस उत्पादनासाठी सरकारने एका आस्थापनाऐवजी १० आस्थापनांना मान्यता द्यावी. त्यांना देशात पुरवठा करू द्यावा आणि मग जेव्हा आपल्याकडे अतिरिक्त लसी येतील, तेव्हा ही आस्थापने परदेशात लसी निर्यात करतील. हे काम १० ते १५ दिवसांत केले पाहिजे, असा सल्ला केंद्रीय रस्तेविकास आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीविषयी केंद्र सरकारला दिला. विद्यापिठांच्या कुलगुरूंसमवेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या वेळी त्यांनी हा सल्ला दिला.
‘Give licence to 10 more vaccine makers, instead of only one,’ says Nitin Gadkari https://t.co/SajWAJ8zhm
— Business Today (@BT_India) May 19, 2021
गडकरी म्हणाले की, अजूनही भारताला औषधांसाठीचा कच्चा माल परदेशातून मागवावा लागतो. आम्हाला भारताला स्वावलंबी बनवायचे आहे. वैद्यकीयदृष्ट्या लागणार्या ऑक्सिजनच्या संदर्भात भारतातील सर्व जिल्हे स्वयंपूर्ण असावेत. देशातील आरोग्यक्षेत्र सध्या एका मोठ्या संकटातून जात आहे. महामारी काळात सकारात्मक रहातांना आपल्याला मनोबल भक्कम ठेवले पाहिजे.
गडकरी यांचे स्पष्टीकरणगडकरी म्हणाले की, जेव्हा मी या गोष्टी बोलत होतो, तेव्हा मला ठाऊक नव्हते की, रसायन आणि खत मंत्री मनसुख मंडाविया यांनी लस उत्पादन वाढवण्यासाठी सरकारच्या प्रयत्नांची माहिती यापूर्वी दिली होती. तसेच त्यांनी मला सांगितले की, सरकार १२ वेगवेगळ्या प्लांट आणि आस्थापने यांमध्ये लस उत्पादित करत आहे. मी त्यांचे अभिनंदन केले आणि म्हटले की, तुम्ही योग्य दिशेने कार्य करत आहात. |