राज्यात नवीन कोरोनाबाधित रुग्ण सापडण्याच्या संख्येत घट, मृत्यूदर मात्र तसाच !
राज्यातील मागील आठवडाभराची आकडेवारी पहाता कोरोनाबाधित रुग्ण सापडण्याच्या संख्येत घट झाली आहे. कोरोनाबाधित रुग्ण सापडण्याच्या प्रमाणात घट होत असली, तरी कोरोनामुळे मृत्यू होत असलेल्या नागरिकांची संख्या ही अद्यापही शेकडोंच्या घरात आहे.