१९ एप्रिलपासून चालू होणार्‍या वैद्यकीय परीक्षा जूनमध्ये होणार !

१९ एप्रिलपासून चालू होणार्‍या वैद्यकीय परीक्षा जूनमध्ये घेण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी ट्वीटद्वारे दिली आहे.

नियम मोडल्यास स्थानिक प्रशासनाने सुविधा बंद कराव्यात ! – मुख्यमंत्री

जीवनावश्यक आणि आवश्यक सेवा सुविधा बंद केलेल्या नाहीत. याचा अर्थ तिथे नियम मोडले जात आहेत किंवा गर्दी होत आहे, असे दृश्य दिसता कामा नये, अन्यथा त्या सुविधा स्थानिक प्रशासनाने बंद कराव्यात, अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.

‘जिभे’चे चोचले !

मनाच्या आहारी जाऊन शरीर स्वास्थ्याकडे दुर्लक्ष करणे, हा एक प्रकारे स्वैराचारच झाला. सोयीपेक्षा आवश्यकतेला प्राधान्य देणे, हे सूज्ञपणाचे लक्षण आहे. शरीर म्हणजे भगवंताने दिलेली देणगी असून त्याच्या पालनाचे दायित्व स्वतःचे आहे, हे कळले पाहिजे. ‘जिभे’पेक्षा शरिराला काय हवे ? याकडे कटाक्ष असला पाहिजे.

ऑक्सिजन सिलिंडर पालटण्यास विलंब झाल्याने नगर येथील २ रुग्णांचा मृत्यू; नातेवाइकांचा आरोप

सरकारी रुग्णालयातील अनास्थेचे बळी ! या प्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे !

केवळ मंदिरात जाणारे नव्हे, तर त्यांचे रक्षण करणारे हिंदु व्हा ! – ह.भ.प. रामकृष्ण हनुमंत महाराज वीर, पंढरपूर

जर मंदिरात होणारी एखादी परंपरा पटत नसेल, तर त्याची तक्रार सरकारकडे न करता आपले धर्मगुरु, शंकराचार्य अथवा हिंदु जनजागृती समिती यांच्याकडे करा.

मुसलमान महिलाही न्यायालयाच्या हस्तक्षेपाविना पतीला तलाक देऊ शकतात ! – केरळ उच्च न्यायालय

मुसलमान महिलाही न्यायालयाच्या हस्तक्षेपाविना पुरुषांना तलाक देऊ शकतात. याला कायदेशीरदृष्ट्या वैध मानण्यात येईल. कुराण महिला आणि पुरुष यांना याविषयी समान अधिकार देतो, असा निकाल केरळ उच्च न्यायालयाने दिला आहे.

भिवंडी येथे एकतर्फी प्रेमातून धर्मांधांनी तरुणीचे ओठ कापले

स्वार्थासाठी कोणत्याही थराला जाणार्‍या धर्मांधांची हिंसक मानसिकता जाणा आणि त्यांच्या प्रेमाला बळी पडू नका !

जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांची जिल्हा क्रीडा संकुल येथील कोरोना आरोग्य केंद्राला भेट !

कोरोनाबाधित रुग्णांची संख्या परत वाढू लागल्याने जिल्हा क्रीडा संकुल येथील कोरोना आरोग्य केंद्र परत चालू करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी १५ एप्रिल या दिवशी आरोग्य केंद्रास भेट देऊन पहाणी केली.

प्रभु श्रीराम आदर्श आहेत हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे !

कुठे ‘भ्रष्टाचार’ करून जनतेचे कुपोषण करणारे सर्वपक्षीय ‘राजकारणी’, तर कुठे प्रजाहितदक्ष असलेले समृद्ध रामराज्य देणारे श्रीराम ! असे हे प्रभु श्रीराम आदर्श आहेत हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे !

आसाममध्ये नरसिंह मंदिरात चोरी !

बलिया गावामध्ये १० एप्रिल या दिवशी नरसिंह मंदिरातील पुजार्‍याच्या कुटुंबियांना मारहाण करून मंदिरातील सोन्याचे दागिने आणि रोख १ लाख रुपये दरोडेखोरांनी पळवून नेले. बलिया गाव बांगलादेशाच्या सीमेला लागून आहे.