नियम मोडल्यास स्थानिक प्रशासनाने सुविधा बंद कराव्यात ! – मुख्यमंत्री

मुंबई – जीवनावश्यक आणि आवश्यक सेवा सुविधा बंद केलेल्या नाहीत. याचा अर्थ तिथे नियम मोडले जात आहेत किंवा गर्दी होत आहे, असे दृश्य दिसता कामा नये, अन्यथा त्या सुविधा स्थानिक प्रशासनाने बंद कराव्यात, अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. १५ एप्रिल या दिवशी उद्धव ठाकरे यांनी राज्यातील मुख्य प्रशासकीय अधिकारी आणि पोलीस अधिकारी यांच्याशी ‘ऑनलाईन’ संवाद साधला. या वेळी उद्धव ठाकरे म्हणाले, ‘‘मागील वेळेस आपण कोरोनाचा संसर्ग रोखून दाखवला होता; मात्र आताची परीक्षा अधिक कठीण आणि आव्हानात्मक आहे. त्यामुळे निर्बंधांचे अतिशय काटेकोरपणे पालन होईल, याकडे सर्व जिल्हाधिकारी आणि पोलीस यंत्रणा यांनी लक्ष द्यावे.’’