मुसलमान महिलाही न्यायालयाच्या हस्तक्षेपाविना पतीला तलाक देऊ शकतात ! – केरळ उच्च न्यायालय

केरळ उच्च न्यायालय

थिरूवनंतपूरम् (केरळ) – मुसलमान महिलाही न्यायालयाच्या हस्तक्षेपाविना पुरुषांना तलाक देऊ शकतात. याला कायदेशीरदृष्ट्या वैध मानण्यात येईल. कुराण महिला आणि पुरुष यांना याविषयी समान अधिकार देतो, असा निकाल केरळ उच्च न्यायालयाने दिला आहे.

महिलांनी पुरुषांना दिलेला तलाक पुरुषांनी महिलांना दिलेल्या तलाकप्रमाणेच असेल, असे न्यायालयाने म्हटले आहे. यापूर्वी वर्ष १९७२ मध्ये देण्यात आलेल्या निकालानुसार कोणतीही महिला न्यायालयाबाहेर पतीला तलाक देऊ शकत नाही.