कुंभमेळ्यात रुग्ण सेवेसाठी ५४ रुग्णवाहिका उपलब्ध

कुंभमेळ्यात पवित्र (शाही) स्नानाच्या दिवशी आपत्कालीन सेवेत २ एम्.आय. रुग्णवाहिका, ५४ चारचाकी आणि ४० दुचाकी रुग्णवाहिकांची सुविधा उपलब्ध झाल्या आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाचे मेळाअधिकारी डॉ. अर्जुनसिंह सेंगर यांनी दिली.

यवतमाळ येथील ‘महिला उत्थान मंडळा’च्या वतीने पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांच्या सुटकेसाठी राष्ट्रपतींना निवेदन !

पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांच्यावर असलेले आरोप सिद्ध झालेले नाहीत, तसेच ते ८ वर्षांपासून कारागृहात असून विविध शारीरिक व्याधींनी ग्रस्त आहेत. त्यांच्या वयाचा विचार करता त्यांची मुक्तता करण्यात यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली.

दळणवळण बंदीमध्ये देशातील १० सहस्र ११३ आस्थापने बंद ! – केंद्र  सरकारची माहिती

एप्रिल २०२० ते फेब्रुवारी २०२१ या दळणवळण बंदीच्या कालावधीमध्ये देशातील १० सहस्र ११३ आस्थापने बंद झाली आहेत. त्यांच्यावर कोणतीही दंडात्मक कारवाई न करता स्वेच्छेने त्या बंद झाल्या आहेत, अशी माहिती कंपनी व्यवहार मंत्रालयाने दिली आहे.

हिंदूंची मंदिरे कधी मुक्त होणार ?

महाशिवरात्रीच्या दिवशी हिंदु महासभेचे २ पुरुष कार्यकर्ते आणि १ महिला पदाधिकारी यांनी ताजमहालमध्ये जाऊन शिवपूजन केले. पोलिसांनी या तिघांना अटक केली आहे. ताजमहाल हे तेजोमहालय नावाचे शिवमंदिर असल्याची हिंदूंची भावना आहे.

पुणे येथील गुन्हेगारी टोळ्या पुन्हा सक्रीय

शहरातील गुन्हेगारीवर वचक बसवण्याच्या पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार शहर पोलिसांनी आंदेकर टोळीवर, तसेच पांडवनगर परिसरात दहशत निर्माण करणार्‍या जयेश लोखंडे याच्यासह ५ जणांवर मकोका अंतर्गत कारवाई केली आहे.

कोरोनाचे संकट असतांना १ मार्चपासून आमदारांचे वेतन पूर्ववत् !

आमदारांचा निधी ४ कोटी रुपये केला ! – अर्थमंत्री अजित पवार यांची मोठी घोषणा, राज्य आर्थिक संकटात असतांना लोकप्रतिनिधींचे वेतन वाढवणे कितपत योग्य ?

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील ध्यानमंदिरात केलेल्या अग्निहोत्राच्या संदर्भात केलेले संशोधन !

अग्निहोत्र-पात्रातील अग्नी शांत झाल्यानंतर (विझल्यानंतर) अग्निहोत्र-पात्र आणि त्यातून निघणारा धूर यांच्यातील सकारात्मक ऊर्जा न्यून होऊन त्यांच्यामध्ये पुष्कळ नकारात्मक ऊर्जा निर्माण होण्याचे कारण.

अग्निहोत्र करण्याचे महत्त्व

अणूबॉम्बसारख्या प्रभावी संहारकाचा किरणोत्सर्ग थोपवण्यासाठी सूक्ष्मातील काहीतरी करावे लागेल. त्यासाठी ऋषीमुनींनी यज्ञाचा प्रथमावतार असलेले ‘अग्निहोत्र’ हा उपाय सांगितला आहे.

देवद आश्रमातील श्री. हनुमंत शिंदे यांना प.पू. भक्तराज महाराज (प.पू. बाबा) यांच्या गाडीजवळ बसून नामजप करतांना आलेल्या अनुभूती

डोळे मिटून ‘ॐ’ हा नामजप करतांना ‘माझ्या डोळ्यांसमोर झेंडूची हिरवीगार झाडे आहेत आणि प.पू. बाबांची संपूर्ण गाडी झेंडूच्या फुलांनी सजवलेली आहे’, असे मला दिसले.

जुना आखाड्याद्वारे दुर्गम भागांत शाळा-महाविद्यालये यांची उभारणी करण्यात येणार

यासाठी जुन्या आखाड्याच्या वतीनेही निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.