अग्निहोत्र करण्याचे महत्त्व

त्रिकालज्ञानी संतांनी सांगितलेलेच आहे की, आता पुढे भीषण आपत्काळ आहे आणि त्यामध्ये जगभरातील बरीच लोकसंख्या नष्ट होणार आहे. आपत्काळाला प्रारंभ झालाच आहे. वाईट शक्तींचा प्रकोप वाढलेल्या कलियुगात आपत्कालात तिसरे महायुद्ध भडकेल. आतंकवादी यंत्रणेपासून संपूर्ण देशाला, समाजाला, परिणामी स्वतःला वाचवायचे असेल, तर अग्नीच्या साहाय्याने ब्रह्मांडमंडलातील त्या त्या देवतांच्या लहरी भूमंडलाकडे आकृष्ट करणारा अन् महिला, पुरुष, मुले असे कुणीही करू शकणारा अग्निहोत्र.

तिसर्‍या महायुद्धाची भीषणता आणि त्यावरील उपाय

तिसर्‍या महायुद्धात अणूबॉम्बच्या किरणोत्सर्गाने प्रदूषण होणार आहे. दुसर्‍या महायुद्धापेक्षा आता जगातील बहुतेक सर्वच राष्ट्रांकडे महासंहारक अशी अण्वस्त्रे आहेत. त्यामुळे ती एकमेकांविरुद्ध डागली जातील. या युद्धामध्ये वाचायचे असेल, तर त्यासाठी अण्वस्त्रे निकामी करणारा, तसेच त्या अण्वस्त्रांपासून निघणारा किरणोत्सर्ग नष्ट करणाराही उपाय हवा. त्याकरता स्थुलातील उपाय उपयोगी नाहीत; कारण अणूबॉम्ब हा नेहमीच्या बॉम्बपेक्षा सूक्ष्म आहे. स्थूल (उदा. बाण मारून शत्रूचा नाश करणे), स्थूल अधिक सूक्ष्म (उदा. मंत्र म्हणून बाण मारणे), सूक्ष्मतर (उदा. नुसते मंत्र म्हणणे) आणि सूक्ष्मतम (उदा. संतांचा संकल्प) असे अधिकाधिक प्रभावशाली टप्पे असतात. स्थुलापेक्षा सूक्ष्म हे कित्येक पटीने प्रभावी असते.

अणूबॉम्बसारख्या प्रभावी संहारकाचा किरणोत्सर्ग थोपवण्यासाठी सूक्ष्मातील काहीतरी करावे लागेल. त्यासाठी ऋषीमुनींनी यज्ञाचा प्रथमावतार असलेले ‘अग्निहोत्र’ हा उपाय सांगितला आहे. हा करण्यास अतिशय सोपा आणि अतिशय अल्प वेळात होणारा; पण प्रभावी असा सूक्ष्मातील परिणाम साधून देणारा असा उपाय आहे. त्यामुळे वातावरण चैतन्यदायी बनते आणि संरक्षककवचही बनते. अग्निहोत्र हा यज्ञ बंधन्मुक्त असल्यामुळे तो स्त्री, पुरुष, मुले असे कोणीही सहजपणे करू शकतो. अग्निहोत्र करणे, हे आकाशमंडलातील सूक्ष्म देवतांच्या तत्त्वांना जागृत करून त्यांच्या लहरी भूमीमंडलावर खेचण्याचे एक प्रभावी माध्यम आहे. अग्निहोत्रामुळे वायूमंडलात सिद्ध (तयार) होणारे दिव्य तेजोमंडल हे पारदर्शक काचेच्या तेजोगोलासारखे असून अणूबॉम्बमधील अतिशय सूक्ष्म अशा संहारक किरणांनाही हे वायूमंडल भेदणे अशक्य होते. यामुळे संहारक घटकांपासूनही जिवाचे आणि त्या त्या वायूमंडलाचे रक्षण होऊ शकते.

सामान्यांनी एवढे जरी केले, तरी पुरे आहे. याहूनही प्रभावी, म्हणजे सूक्ष्म उपाय म्हणजे साधना करणे. साधनेने आत्मबल प्राप्त होते आणि आपल्या कार्याला बळ प्राप्त होते. सामान्य व्यक्तीने अग्निहोत्र करण्याने जो लाभ होईल, तो लाभ साधना करणार्‍या आणि ६० टक्के आध्यात्मिक प्रगती झालेल्या साधकाने नुसत्या प्रार्थनेने साध्य होतो.

पुढे येणार्‍या आपत्काळात आपला जीव न जावा आणि इतरांचा वाचावा, यांसाठी अग्निहोत्र आणि साधना करा !

(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘अग्निहोत्र’)

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  •  सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.