देवद आश्रमातील श्री. हनुमंत शिंदे यांना प.पू. भक्तराज महाराज (प.पू. बाबा) यांच्या गाडीजवळ बसून नामजप करतांना आलेल्या अनुभूती

श्री. हनुमंत शिंदे

१. ‘११.१.२०२० या दिवशी मी देवद आश्रमातील प.पू. भक्तराज महाराज (प.पू. बाबा) यांच्या गाडीजवळ बसून नामजप करत होतो. तेव्हा डोळे मिटून ‘ॐ’ हा नामजप करतांना ‘माझ्या डोळ्यांसमोर झेंडूची हिरवीगार झाडे आहेत आणि प.पू. बाबांची संपूर्ण गाडी झेंडूच्या फुलांनी सजवलेली आहे’, असे मला दिसले. नंतर तेथे अनुमाने अर्धा घंटा मला सुगंध येत होता.

. १२.१.२०२० या दिवशी नामजपासाठी गाडीजवळ बसल्यावर माझा ‘ॐ’ हा नामजप चालू झाला. त्या वेळी डोळे मिटून नामजप करतांना ‘प.पू. बाबांच्या गाडीजवळ तुळशीची रोपे आहेत आणि त्या गाडीच्या सभोवती अन् तेथील परिसरात सर्वत्र अबोली आणि झेंडू यांच्या फुलांच्या पाकळ्या आहेत’, असे मला दिसले.

३. वरील दोन्ही दिवसांमध्ये माझ्याकडून प्रत्येकी ४२० वेळा प्रार्थना अन् कृतज्ञता आणि ४५ सहस्र ३६० वेळा नामजप झाला.’

– श्री. हनुमंत शिंदे (वय ७६ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१३.१.२०२०)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक