जुना आखाड्याद्वारे दुर्गम भागांत शाळा-महाविद्यालये यांची उभारणी करण्यात येणार

श्रीमहंत हरि गिरिजी महाराज

हरिद्वार – जुना आखाड्याच्या महामंडलेश्‍वरांनी आपापल्या क्षेत्रातील दुर्गम भागांत सामाजिक कार्य करण्याचे आवाहन जुना आखाड्याचे आंतरराष्ट्रीय संरक्षक श्रीमहंत हरि गिरिजी महाराज यांनी केले आहे. श्रीमहंत हरि गिरिजी महाराज यांच्या उपस्थितीत त्यांच्या ४ शिष्यांचा महामंडलेश्‍वर पट्टाभिषेक महामंडलेश्‍वर अवधेशानंद गिरि महाराज यांनी केला. या प्रसंगी श्रीमहंत हरि गिरिजी महाराज म्हणाले की, महामंडलेश्‍वरांनी आपापल्या क्षेत्रातील दुर्गम भागांत शाळा, महाविद्यालये, वृद्धाश्रम आणि दिव्यांग (विकलांग) आश्रम बोलीच्या निधीद्वारे बनवू शकतात. यासाठी जुन्या आखाड्याच्या वतीनेही निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शाळा आणि महाविद्यालये यांच्या बांधकामासाठी विनामूल्य भूमी मिळावी, यासाठी आपण सरकारशी चर्चा करणार आहोत, असेही ते म्हणाले.