पोलिसांकडे महागाच्या गाड्या कोठून आल्या ? – अजित पवार, उपमुख्यमंत्री

‘पोलीस किती भ्रष्ट आहेत’, हे पवारांना माहीत नाही, असे नाही. त्यामुळे पोलिसांच्या पत्नी घराचे प्रश्‍न घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे गेल्याच्या पार्श्‍वभूमीवर पवार यांनी ही पोलिसांना दिलेली गर्भित चेतावणी तर नाही ना ?, असे कुणालाही वाटू शकते !

कालीदेवीच्या प्रकोपामुळे ऋषीगंगा नदीवरील जलविद्युत प्रकल्प पूर्णत्वास जात नसल्याचे ग्रामस्थांचे मत !  

‘नदीच्या प्रवाहामध्ये कुणीही बाधा आणू नये’, अशी देवीची इच्छा आहे, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. ग्रामस्थांचे हे मत सरकार आता तरी विचारात घेईल का ?

बनावट पावतीद्वारे श्रीराम मंदिर निधी संकलन करणार्‍याच्या विरोधात जळगाव येथे गुन्हा नोंद !

श्रीराम मंदिर निधी संकलन अभियान पूर्ण झाले असूनही निधी संकलनासाठी बनावट पावती पुस्तक सिद्ध करून पैसे गोळा करणार्‍या भामट्याला नागरिकांनी चांगलाच चोप देत शहर पोलिसांच्या कह्यात दिले. तसेच त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला.

अर्थसंकल्पीय अधिवेशन किमान ४ आठवडे व्हावे ! – देवेंद्र फडणवीस

अधिवेशन किमान ४ आठवडे व्हायला हवे, असे मत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मांडले. जर सरकारने अधिवेशनाचा कालावधी अल्प केला, तर प्रश्‍नांपासून पळ काढण्यासाठी सरकारचा हा प्रयत्न असेल, असा आरोप त्यांनी केला आहे.

नवी मुंबई महापालिकेचा ४ सहस्र ८२५ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प संमत

महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक अभिजित बांगर यांनी महापालिकेचा वर्ष २०२०-२१ चा सुधारित आणि वर्ष २०२१-२२ चा मूळ ४ सहस्र ८२५ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प अर्थसंकल्प संमत केला.

…तर परत टाळेबंदीला सामोरे जावे लागेल ! – पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांची संभाजीनगरकरांना चेतावणी

शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत राहिले, तर रात्रीच्या संचारबंदीचा निर्णय घ्यावा लागेल आणि वेळप्रसंगी दिवसाही संचारबंदी करावी लागेल’, अशी चेतावणी येथील पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी १८ फेब्रुवारी या दिवशी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

बंगालमधील भाजप युवा मोर्चाच्या महिला नेत्याला ५ लाख रुपयांच्या कोकीनसहीत अटक

ज्या आरोपाखाली भाजपच्या नेत्याला अटक झाली आहे, ते आरोप गंभीर आहेत.

‘डिजिटल’ आतंकवाद !

आज संपूर्ण जग हे मानवाच्या बोटांवर आले आहे’, असे म्हटले जाते. कोणत्याही गोष्टीविषयी जाणून घ्यायचे झाले, तर तो शब्द इंटरनेटवर ‘शोधा नव्हे, तर ‘गूगल’ करा !’

महायुद्ध, भूकंप इत्यादी आपत्तींना प्रत्यक्ष सामोरे कसे जावे ?

सनातन गेली अनेक वर्षे सांगत असलेला आपत्काळ दाराच्या उंबरठ्यावर उभा आहे. कधीही तो आता प्रवेश करू शकतो.

तंत्रज्ञानाचा आधिक वापर करून रस्ते अपघातावर नियंत्रण मिळवणार ! – पोलीस आयुक्त, नवी मुंबई

३२ व्या रस्ता सुरक्षा अभियान निमित्ताने ‘एक पाऊल… अपघातमुक्त समाजाकडे’ या विषयावर नवी मुंबई पोलीस वाहतूक विभाग आणि नवी मुंबई प्रेस क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने संवाद व्यवस्थेशी या उपक्रमांतर्गत वाशी येथे परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.