‘पोलीस किती भ्रष्ट आहेत’, हे अजित पवार यांना ठाऊक नाही का ? त्यांनी असे केवळ न सांगता संबंधितांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करणे अपेक्षित आहे !
मुंबई – काही पोलिसांकडे ३५ लाख रुपये मूल्याच्या महागड्या गाड्या पाहिल्या. कामाच्या वेळेत पोलीस त्याचा वापर करत होते. एका उद्योगपतीने अशा महागड्या गाड्या पोलिसांना दिल्या, असे समजले. सरकारी कर्मचार्यांनी कशी वाहने वापरावीत, याचे नियम आहेत. पोलीस शासकीय कर्मचारी असून उद्योगपतींनी दिलेल्या महागड्या गाड्या सरकारी नोकरी करतांना वापरणे चुकीचे आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी १९ फेब्रुवारीला पुण्यातील पोलिसांच्या कार्यक्रमात उघडपणे सांगितले.
‘सरकारी नोकरी करणाऱ्यांनी कुणी कशी वाहने वापरावी याबाबत नियमावली आहे’, पोलिस अधिकाऱ्यांच्या महागड्या गाड्या पाहून अजित पवारांचं भाष्य
#Abpmajha #NewsUpdate #Latestnews #AjitPawar @AjitPawarSpeakshttps://t.co/977WpYCWvY— ABP माझा (@abpmajhatv) February 20, 2021
या वेळी उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, गृहमंत्री कोणते वाहन वापरतात आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी कोणत्या वाहनाने फिरतात, याकडे जनतेचे लक्ष असते. पोलिसांना लागणार्या पायाभूत सुविधा देण्याचा शासन प्रयत्न करत आहे. पोलिसांच्या घराचे काम सरकार प्राधान्याने करत असून त्यासाठी निधीही देत आहे. जादा एफ्.एस्.आय. (अतिरिक्त चटईक्षेत्र) आणि चांगल्या प्रकारचे दर्जेदार घर देण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत, असेही ते या वेळी म्हणाले.