बरेली (उत्तरप्रदेश) येथे लव्ह जिहादविरोधी पहिला गुन्हा नोंद

उत्तरप्रदेश सरकारने लव्ह जिहादविरोधी कायदा संमत केल्यानंतर बरेली येथे पहिला गुन्हा नोंदवण्यात आला आहे. हिंदु तरुणीला विवाहासाठी धर्मांतर करण्याचा दबाव टाकल्यावरून तरुणीच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीनंतर हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

गाजीपूर (देहली) येथे गोहत्या केल्यानंतर फेकलेले गायींचे शिर दाखवणारा व्हिडिओ प्रसारित

गोमाताद्रोही देहली पोलीस ! देहली पोलीस केंद्र सरकारच्या अखत्यारीत असतांना त्यांच्याकडून अशा प्रकारची निष्क्रीयता दाखवणे हिंदूंना अपेक्षित नाही !

बुलंदशहर (उत्तरप्रदेश) येथे मुसलमान कुटुंबाकडून हिंदु तरुणीचे अपहरण केल्याची वडिलांची तक्रार

येथे २१ वर्षीय हिंदु मुलीच्या वडिलांनी त्यांच्या मुलीचे त्यांच्या शेजारी रहाणार्‍या मुश्ताक कुटुंबाने अपहरण केल्याची तक्रार येथील पोलीस ठाण्यात केली आहे. मुलीच्या जीविताला धोका असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

धर्मांध युवकाकडून धर्मांतरासाठी दबाव येत असल्याने मुलीने आत्महत्या केल्याची तिच्या आईची पोलिसांत तक्रार

लव्ह जिहादची अनेक प्रकरणे आजूबाजूला घडत आहेत ! असे असूनही ‘लव्ह जिहाद कुठे आहे ?’, असे विचारले जाते ! अजून किती युवतींचा बळी गेल्यानंतर या विरोधात ठोस पावले उचलणार ?

ओल्ड गोवा परिसरात चर्चपेक्षा उंच इमारती येऊ नयेत, यासाठी हस्तक्षेप करण्याविषयी विजय सरदेसाई यांचे युनेस्को आणि आयकोमॉस संस्थांना पत्र

गोवा फॉरवर्ड पक्षाचे नेते विजय सरदेसाई यांनी युनेस्को, वर्ल्ड हेरिटेज सेंटर आणि आयकोमॉस या संस्थाना पत्र पाठवून ओल्ड गोवा परिसरात उंच इमारती, तसेच बांधकाम प्रकल्प उभारण्यास शासन अनुमती देईल, अशी काळजी व्यक्त केली आहे.

मंगळुरू येथे आणखी एका ठिकाणी लष्कर-ए-तोयबा आणि तालिबान यांच्या समर्थनार्थ भिंतीवर लिखाण

पोलिसांनी पहिल्यांदा लिखाण करणार्‍यांवर कठोर कारवाई केली असती, तर पुन्हा दुसर्‍या ठिकाणी लिखाण झाले नसते ! आताही पोलीस निष्क्रीय राहिले, तर सर्वत्रच असे लिखाण करण्यात येऊ शकते !

महिलांचा आत्मसन्मान महत्त्वाचा !

लव्ह जिहाद्यांच्या कारस्थानांना हिंदु युवती बळी पडू नयेत, धर्मांतरासाठी दाखवल्या जाणार्‍या आमिषाला बळी पडू नये, याकरता बालपणापासूनच नीतीमूल्यांचे शिक्षण देणे, स्वधर्माविषयी अभिमान वाढेल, असे धर्मशिक्षण देणे, आयुष्यातील कठीण प्रसंगांत स्थिर राहून धर्माची कास धरून वाट काढणे, हेच आता हिंदु समाजाला शिकवायला हवे !

माओवाद्यांच्या आक्रमणात नाशिकमधील एक सैनिक हुतात्मा, तर १० जण घायाळ

माओवाद्यांच्या आक्रमणात नाशिक जिल्ह्यातील कमांडेंट नितीन भालेराव हा सैनिक हुतात्मा झाला. या आक्रमणात १० सैनिक घायाळ झाले. माओवाद्यांनी कोबरा बटालियनच्या सैनिकांच्या वाहन ताफ्यावर स्फोट घडवला.

मुलींनी ‘लव्ह जिहाद’ला बळी पडू नये; म्हणून त्यांना साधना शिकवून सात्त्विक करणे, हाच त्यावरील खरा उपाय आहे !

‘महाराष्ट्रातील सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक संतुलन राखण्यासाठी, तसेच विश्‍वासघातकी लोकांपासून मुली अन् महिला यांचे रक्षण व्हावे, यासाठी महाराष्ट्रात ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात कठोर कायदा करावा – भाजपचे नेते राज पुरोहित

विश्‍वकल्याणासाठी भारताचे रक्षण आवश्यक !

‘विश्‍वाचे कल्याण आणि लाभ यांच्यासाठी भारताचे रक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे; कारण केवळ भारतच विश्‍वाला शांती आणि न्याय व्यवस्था देऊ शकतो.’
– मदर, अरविंद आश्रम (हिन्दू चिंतन)