गाजीपूर (देहली) येथे गोहत्या केल्यानंतर फेकलेले गायींचे शिर दाखवणारा व्हिडिओ प्रसारित

हिंदूंकडून अनेकदा तक्रार आणि आंदोलन करूनही पोलीस गोहत्या रोखण्यात निष्क्रीय !

गोमाताद्रोही देहली पोलीस ! देहली पोलीस केंद्र सरकारच्या अखत्यारीत असतांना त्यांच्याकडून अशा प्रकारची निष्क्रीयता दाखवणे हिंदूंना अपेक्षित नाही !

हे छायाचित्र छापण्यामागे लोकांच्या धार्मिक भावना दुखावण्याचा उद्देश नसून वस्तूस्थिती कळावी, या उद्देशाने हे प्रसिद्ध केले आहे. –  संपादक

देहली – येथील गाजीपूरमध्ये ४-५ गायींचे कापलेले शिर सापडल्याचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. यापूर्वीही अशा घटना येथे घडलेल्या आहेत; मात्र त्याविषयी पोलिसांकडून कोणतीही कारवाई झालेली नाही, असे हिंदूंकडून सांगण्यात येत आहे.

या व्हिडिओमध्ये एक तरुण सांगत आहे की, या घटनास्थळापासून १०० मीटर अंतरावर पोलीस ठाणे असतांना येथे सातत्याने गोहत्या होत असते. गाजीपूर डेअरी फार्ममधून गायी आणून येथे त्यांची हत्या केली जाते. पोलिसांना याची सातत्याने माहिती देण्यात आली आहे, आंदोलन करून रस्ताबंदही करण्यात आला होता; मात्र तरीही पोलीस कुठलीही कारवाई करत नाहीत.