विश्‍वविद्यालयात आत्मज्ञानाविषयी चर्चा होणे आवश्यक !

ज्या लोकांचा आत्म्यावर विश्‍वास नाही, ते लोक अत्यंत दुर्दैवी दशेत आहेत. आपण कुठून आलो आणि कुठे जाणार आहोत ? याचे ज्ञान नसते. आत्मज्ञान हे सर्वांत महत्त्वाचे ज्ञान आहे; पण त्या ज्ञानाची चर्चा कोणत्याही विश्‍वविद्यालयात होत नाही

कुडाळ तहसीलदारांवर आक्रमण करण्याचा प्रयत्न करणार्‍या चौघा वाळूमाफियांवर गुन्हा नोंद 

अवैध गौण खनिज वाहतूक रोखण्यासाठी गस्तीवर असतांना २८ नोव्हेंबरला मध्यरात्री २ वाजता तालुक्यातील आंदुर्ले खिंड येथे वाळूमाफियांनी कुडाळचे तहसीलदार अमोल पाठक आणि त्यांचे सहकारी कर्मचारी यांच्यावर प्राणघातक आक्रमण करण्याचा प्रयत्न केला.

मालवण तालुक्यातील धामापूर तलावाची जागतिक वारसा म्हणून निवड

तालुक्यातील धामापूर येथील श्री भगवतीदेवी मंदिराजवळ असलेल्या  प्राचीन धामापूर तलावाची ‘वर्ल्ड हेरिटेज इरिगेशन साईट’ म्हणून जागतिक स्तरावर निवड करण्यात आली आहे. या पार्श्‍वभूमीवर तलावाची ‘वर्ल्ड हेरिटेज इरिगेशन स्ट्रक्चर अ‍ॅवॉर्ड २०२०’साठी निवड करण्यात आली आहे.

मालवण तालुक्यात लेप्टोच्या रुग्णसंख्येत वाढ

तालुक्यात काही प्रमाणात कोरोना रुग्णांची संख्या घटत आहे, तर दुसरीकडे लेप्टोस्पायरोसिसचे (लेप्टोचे) रुग्ण वाढत आहेत. मागील ८ दिवसांत तालुक्यात ६ रुग्ण आढळले आहेत. यामुळे आरोग्ययंत्रणा सतर्क बनली आहे.

वेतन आयोगापासून वंचित कर्मचारी !

वेतन संरचनेच्या मागील आकडेवारीनुसार ४ था वेतन आयोग वर्ष १९८६, ५ वा वेतन आयोग वर्ष १९९६, ६ वा वेतन आयोग वर्ष २००६, तर ७ वा वेतन आयोग १ जानेवारी २०१६ पासून सर्व शासकीय कर्मचार्‍यांना लागू झाला; मात्र महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अद्यापही ७ व्या वेतन आयोगापासून वंचित आहे.

गोव्यातील खाणी चालू करण्याविषयी केंद्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद !  मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

गोव्यातील खाणी पुन्हा चालू करण्याविषयी केंद्रशासन सकारात्मक असून याविषयी कायद्याच्या आणि न्यायालयीन दृष्टीकोनातून तोडगा काढण्याचा विचार करत आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

ओवैसी यांनी लिहून दिल्यास रोहिग्यांना बाहेर हाकलू ! – अमित शहा यांचे प्रत्युत्तर

‘जर हैद्राबादमध्ये अवैधरित्या बांगलादेशी आणि रोहिंग्या रहात आहेत, तर अमित शहा कारवाई का करत नाही ?’, असा प्रश्‍न ओवैसी यांनी विचारला होता. त्याला शहा यांनी उत्तर दिले.

कुजलेल्या कांद्याऐवजी चांगला कांदा देण्याविषयी नाफेड संस्थेशी शासनाची बोलणी !   गोविंद गावडे, नागरीपुरवठा मंत्री

कुजलेला कांदा परत घ्यावा किंवा त्याच्या बदल्यात चांगला कांदा गोव्याला पुरवावा, याविषयी गोवा शासन ‘नाफेड’ या संस्थेशी बोलणी करत आहे, असे नागरीपुरवठा मंत्री गोविंद गावडे यांनी सांगितले.

सिंधुदुर्गात कोरोनामुळे आणखी २ मृत्यू

गेल्या २४ घंट्यांत जिल्ह्यात २ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या १४४ झाली आहे.

गोव्यात पुन्हा दळणवळण बंदी लागू होणार नाही ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, ‘‘गोव्यात पुन्हा दळणवळण बंदी लागू करण्याची आवश्यकता नाही. मास्क घालणे, सामाजिक अंतर पाळणे, गर्दी न करणे इत्यादी मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून गोव्यातील लोक कोरोनाचा पराभव करू शकतात.’’