धर्मांध युवकाकडून धर्मांतरासाठी दबाव येत असल्याने मुलीने आत्महत्या केल्याची तिच्या आईची पोलिसांत तक्रार

धर्मांध सोहेल शेख याच्या विरोधात गुन्हा नोंदवून अटक

  • लव्ह जिहादची अनेक प्रकरणे आजूबाजूला घडत आहेत ! असे असूनही ‘लव्ह जिहाद कुठे आहे ?’, असे विचारले जाते ! अजून किती युवतींचा बळी गेल्यानंतर या विरोधात ठोस पावले उचलणार ?
  • धर्मांधांचे खरे स्वरूप ओळखून पालकांनी आपल्या पाल्याला सतर्क करावे !

नगर – येथील तारकपूर परिसरात सोहेल शेख या युवकाने १५ वर्षीय मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून धर्मांतरासाठी बळजोरी केल्याने तिने आत्महत्या केल्याची तक्रार मुलीच्या आईने तोफखाना पोलीस ठाण्यात केली. त्यानंतर पोलिसांनी सोहेल शेख (वय १९ वर्षे) या तरुणाविरोधात गुन्हा नोंद करून त्याला अटक केली.

आईने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की,

१. सोहेल शेख याने माझ्या पतीला फोन करून ‘तुमच्या मुलीचे लग्न जर माझ्याशी लावून दिले नाही, तर आख्ख नगर पेटवून देईल’, अशी धमकी दिली होती. (१९ वर्षीय युवकाचे संपूर्ण शहर पेटवण्याची धमकी देण्याचे धाडस कसे होते ? – संपादक)

२. मुलीनेही सोहेल याच्या विरोधात ‘चाइल्ड लाइन’मध्येही तक्रार केली होती.

३. गेल्या दोन मासांपासून माझी मुलगी अत्यंत अस्वस्थ होती. ती कोणाशी अधिक काही बोलत नव्हती. तिने आमच्या नातेवाइकांच्या घरी लग्नसोहळ्यात २४ नोव्हेंबरला मावस भावासमवेत छायाचित्रे काढली होती. ही छायाचित्रे तिने सामाजिक खात्यांवरून प्रसारित केल्यानंतर त्यावरून सोहेल याने त्या मावसभावालाही लघुसंदेश करून शिवीगाळी केली होती. (युवतींनी सामाजिक संकेतस्थळांवर छायाचित्रे प्रसारित केल्याने त्यांचा दुरुपयोग होण्याचीच शक्यता अधिक असते ! युवतींनी आणि त्यांच्या पालकांनी ही उदाहरणे लक्षात घेतली पाहिजेत ! – संपादक)

४. माझ्या भावाच्या मुलीला देखील माझ्या मुलीने सांगितले होते की, ‘सोहेल मला त्रास देत आहे. तो माझ्याशी नेहमी भांडतो.’ त्यानंतर २५ नोव्हेंबरला माझ्या मुलीने घरामध्ये आत्महत्या केली.