मंगळुरू येथे आणखी एका ठिकाणी लष्कर-ए-तोयबा आणि तालिबान यांच्या समर्थनार्थ भिंतीवर लिखाण

  • पोलिसांनी पहिल्यांदा लिखाण करणार्‍यांवर कठोर कारवाई केली असती, तर पुन्हा दुसर्‍या ठिकाणी लिखाण झाले नसते !
  • आताही पोलीस निष्क्रीय राहिले, तर सर्वत्रच असे लिखाण करण्यात येऊ शकते !

मंगळुरू (कर्नाटक) – मुंबईवरील २६/११ ला झालेल्या जिहादी आतंकवादी आक्रमणाला १२ वर्षे झाल्याच्या निमित्ताने येथे एका ठिकाणी भिंंतीवर चिथावणी देणारे लिखाण करण्यात आले होते. नंतर पोलिसांनी ते पुसून टाकले आणि अज्ञाताच्या विरोधात गुन्हा नोंदवला होता. आता अन्य एका ठिकाणी पुन्हा अशाच प्रकारचे लिखाण करण्यात आल्याचे समोर आले आहे.

एका निवासी इमारतीच्या भिंतीवर लिहिण्यात आले, ‘आम्हाला चिथावणी दिली, तर आमच्याकडून आंतरराष्ट्रीय आतंकवादी संघटना देशात आणल्या जातील. रा.स्व. संघ आणि मनुवादी यांच्याशी सामना करण्यास आम्हाला लष्कर-ए-तोयबा अन् तालिबानी यांना निमंत्रण देण्यास भाग पाडू नका. # लष्कर जिंदाबाद’, अशी धमकी देण्यात आली आहे.