मशिदी मुसलमान आणि चर्च ख्रिस्ती चालवतात; मग हिंदूंना मंदिरे चालवण्याचा अधिकार का नाही ? – केरळचे भाजप अध्यक्ष के. सुरेंद्रन्

बहुसंख्य समुदायावर लादलेली धर्मनिरपेक्षता इतर धर्मांसाठी नाही. मार्क्सवादी आणि काँग्रेस चे नेते मानसिक संतुलन गमावल्यासारखे वागत आहेत.

रा.स्व. संघाने फसवून श्रीराममंदिरासाठी देणगी घेतल्याचे सांगत केरळमधील काँग्रेसच्या आमदाराचा थयथयाट !

धर्मप्रेमी हिंदू आणि रामभक्त यांच्या भक्तीमुळे आणि त्यागामुळे अयोध्येत श्रीराममंदिर उभारले जाईल, त्यासाठी एल्धोस कुन्नाप्ली यांच्यासारख्या काँग्रेसी नेत्यांच्या पैशांची हिंदूंना आवश्यकता नाही !

(म्हणे) ‘भाजप सरकारच्या काळात हिंदू असुरक्षित !’ – आम आदमी पक्षाची रिंकू शर्मा यांच्या हत्येवरून टीका

देहलीत आम आदमी पक्षाचे सरकार आहे. राजधानीत समाजविघातक कारवाया करणारे रोहिंग्या मुसलमान आणि बांगलादेशी घुसखोर अवैधपणे रहात असून त्यामुळे धोका निर्माण झाला आहे. याविषयी आपवाले कधील ‘ब्र’ही काढत नाहीत !

इस्लाम हा आतंकवादी आणि ढोंगी धर्म ! – कुवेतची गायिका इब्तिसाम हामिद

इब्तिसाम हामिद यांनी इस्लामचा त्याग करून स्वीकारला ज्यू धर्म !

आंदोलन करण्याचा अधिकार म्हणजे वाटेल तेथे, वाटेल तेव्हा धरणे देता येत नाही ! – सर्वोच्च न्यायालय

‘कुठेही निदर्शने करता येतात; मात्र प्रदीर्घ काळासाठी कोणत्याही प्रकारच्या आंदोलनांसाठी सार्वजनिक स्थळी दीर्घकाळ ठिय्या देता येत नाही. विशेषकरून इतरांच्या हक्कांवर प्रतिकूल परिणाम होत असेल, अशा जागी.’

बंंगालमध्ये भाजपचे नेते गावठी बॉम्बच्या आक्रमणात घायाळ

बंगालमधील कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा उडाले असतांनाही त्याविषयी मौन बाळगणारे सर्वपक्षीय नेते, निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी ! केंद्रातील भाजप सरकारने याची गंभीर नोंद घेऊन याविषयी कृती करणे आवश्यक !

‘व्हॅलेंटाईन डे’च्या नावाखाली होणारे अपप्रकार रोखण्यासाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून ठिकठिकाणी निवेदने

नांदेड, परभणी, सांगली आणि बत्तीसशिराळा (जिल्हा सांगली) येथे ‘व्हॅलेंटाईन डे’चे अपप्रकार रोखण्यासाठी निवेदन

सज्ञानी तरुण आणि तरुणी सहमतीने विवाह करत असतील, तर पोलीस त्यांची चौकशी करू शकत नाही ! – सर्वोच्च न्यायालय

सज्ञानी असतांनाही फूस लावून जर कुणी बलपूर्वक विवाह करण्यासाठी दबाव टाकत असेल किंवा विवाह करत असेल, तर अशांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, असा आदेशही न्यायालयाने द्यावा, असे जनतेला वाटते !

राज्याला १ लाख १४ सहस्र कोटी रुपयांची आर्थिक तूट

कोरोनाच्या संकटासह राज्यावर आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे राज्याच्या तिजोरीवर या आर्थिक वर्षात १ लाख १४ सहस्र कोटी रुपयांची आर्थिक तूट आली आहे, अशी माहिती अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याच्या वित्तीय स्थितीविषयी सादरीकरण करतांना राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत दिली.

भंडारा येथील तहसीलदार निवृत्ती उइके यांना १० सहस्र रुपयांची लाच घेतांना अटक

लाच घेणार्‍या गुन्हेगारांवर प्रशासन आणि पोलीस कठोर कारवाई करत नसल्याने गुन्हेगार समाजात मनमानी पद्धतीने कारभार करतात. भ्रष्टाचाराने पोखरलेले महसूल खाते !