‘व्हॅलेंटाईन डे’च्या नावाखाली होणारे अपप्रकार रोखण्यासाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून ठिकठिकाणी निवेदने

नांदेड, परभणी, सांगली आणि बत्तीसशिराळा (जिल्हा सांगली) येथे ‘व्हॅलेंटाईन डे’चे अपप्रकार रोखण्यासाठी निवेदन

नांदेडचे उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी यांना निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ

नांदेड – ‘व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशी होणारे अपप्रकार रोखण्यासाठी १४ फेब्रुवारी हा दिवस शाळा, महाविद्यालये येथे मातृ-पितृ पूजन दिवस म्हणून साजरा करण्यास प्रोत्साहन मिळावे यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नांदेड येथील उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी, नांदेड पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे, शिक्षणाधिकारी गजेवार यांना निवेदन देण्यात आले. या वेळी विश्‍व हिंदु परिषदेचे नांदेड शहर महामंत्री श्री. गणेश कोकुलवार, धर्मप्रेमी श्री. पुरभाजी तिडके, श्री. शंकर सोनटक्के, श्री. सोपान सोनटक्के, श्री. श्रीनिवास बासारकर, श्री. परमेश्‍वर सोनटक्के आणि हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्री. गणेश कोंडलवार हे उपस्थित होते.

परभणी – १२ फेब्रुवारी या दिवशी उपजिल्हाधिकारी महेश वडोदकर यांना निवेदन देण्यात आले. या वेळी योग वेदांत समितीचे श्री. कैलाश देशमुख, परशुराम संस्कार संघाचे श्री. सुधाकर पाटील, राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामी साहित्य अभ्यास मंडळाचे श्री. संजय जोशी, श्री. वजरकर, गंधर्व प्रतिष्ठानचे श्री. सुरेश जामकर आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. श्रीनिवास दिवाण उपस्थित होते.

बत्तीसशिराळा (जिल्हा सांगली) – ‘व्हॅलेंटाईन डे’च्या नावाखाली होणारे अपप्रकार रोखण्यासाठी शिराळा येथील पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले. या वेळी धर्मप्रेमी सर्वश्री अशोक म्हस्कर, सर्वश्री शिवकुमार (सनी) आवटे, रोहित गायकवाड, राजेंद्र खुर्द, सुधीर घोलपे, करणसिंह परदेशी, ऋतुराज पाटील, धनंजय कोळेकर उपस्थित होते.

‘व्हॅलेंटाईन डे’च्या नावाखाली होणारे अपप्रकार रोखण्यासाठी १४ फेब्रुवारी हा दिवस शाळा-महाविद्यालयांत ‘मातृ-पितृ दिवस’ म्हणून साजरा करण्यास प्रोत्साहन द्या ! – हिंदु जनजागृती समितीचे आमदार सुधीर गाडगीळ यांना निवेदन

आमदार सुधीर गाडगीळ (डावीकडे) यांना निवेदन देतांना सौ. स्मिता माईणकर

सांगली, १४ फेब्रुवारी (वार्ता.) – ‘व्हॅलेंटाईन डे’च्या नावाखाली होणारे अपप्रकार रोखण्यासाठी १४ फेब्रुवारी हा दिवस शाळा-महाविद्यालयांत ‘मातृ-पितृ दिवस’ म्हणून साजरा करण्यास प्रोत्साहन द्या, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने भाजप आमदार सुधीर गाडगीळ यांना देण्यात आले. या वेळी सनातन संस्थेच्या सौ. स्मिता माईणकर आणि सौ. सरिता चौगुले उपस्थित होत्या. याच आशयाचे निवेदन सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या नगरसेविका सौ. सुनंदा राऊत यांनाही देण्यात आले.