मुंबई – भारतात ९० टक्के हिंदू रहातात. त्यामुळे हिंदूंचे हित जपणे, हा गुन्हा होऊ शकत नाही. देशातील कट्टरपंथी, बांगलादेशी हे हिंदूंचे सण, मिरवणुका यांवर दगडफेक करतात. याविरोधात आवाज उठवल्याविषयी गुन्हा नोंदवला जात असेल, तर हिंदुहितासाठी असंख्य गुन्हे अंगावर घ्यायला मी सिद्ध आहे, असे विधान भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केले.
मुसलमानांविरोधातील वक्तव्याविषयी प्रविष्ट केलेल्या गुन्ह्यांविषयी विचारले असता नितेश राणे म्हणाले, ‘‘मी कोणत्याही राजकीय पक्षाचा आमदार म्हणून नाही, तर हिंदू म्हणून आवाज उठवत आहे आणि उठवत राहीन. जेथे ‘लव्ह जिहाद’ आणि ‘भूमी जिहाद’ आहे, तेथे मी पोचत आहे. आम्ही सर्व मुसलमानांच्या विरोधात नाही. जो देशभक्त मुसलमान या देशाला आपला मानतो, तोच खरा मुसलमान ! पाकिस्तानी झेंडे फडकावल्यावर माझ्या कोकणातील मुसलमानांनी त्याचा निषेध केला. ते खरे देशभक्त ! ‘हिंदूंना त्रास द्या आणि २०४७ पर्यंत इस्लाम राष्ट्र निर्माण करा’, ही जिहादींची योजना आहे. हे होऊ नये, अशी आमची तळमळ आहे. आम्ही पोलिसांच्या विरोधात नाही; पण संध्याकाळच्या बिर्याणीनिमित्त आपले कर्तव्य विसरणारे काही अधिकारी आहेत. धर्म संकटात असतांना हे अधिकारी त्या लोकांना साहाय्य करतात. राजकीय पक्षाचे कार्यकर्ते होण्यापूर्वी आपण सर्व हिंदू आहोत.’’