पुणे – अल्पवयीन आरोपीचे वय १८ वरून १४ करायला हवे. याविषयी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासमवेत चर्चा करणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी शक्ती अभियान चालू करणार असल्याचा निर्णय घेतल्याचेही त्यांनी सांगितले.