मुंबई – कोरोनाच्या संकटासह राज्यावर आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे राज्याच्या तिजोरीवर या आर्थिक वर्षात १ लाख १४ सहस्र कोटी रुपयांची आर्थिक तूट आली आहे, अशी माहिती अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याच्या वित्तीय स्थितीविषयी सादरीकरण करतांना राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत दिली.
अजित पवार म्हणाले की, कोरोनाच्या उपाययोजनांवर प्रत्येक मासाला १२ सहस्र कोटी रुपये व्यय करावा लागत होता. २५ सहस्र कोटी रुपयांची शेतकर्यांच्या कर्जमाफी योजना राज्य सरकारने पूर्ण केली. नैसर्गिक आपत्तीत हानी झालेल्यांना २५ सहस्र कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे, असे पवार यांनी सांगितले.
प्रत्येक आमदाराला प्रत्येकी ३ कोटी रुपयांचा आमदार निधीही या संकटात देण्यात आला. जिल्हा विकास योजनांचा निधीही देण्यात आला. अनेक अत्यावश्यक योजनांवर राज्य सरकारने व्यय केला आहे. त्यामुळे पुढील दोन मासांत सर्वच विभागांनी काटकसर करावी, असे आवाहन अजित पवार यांनी केले आहे.