पुणे – येथील वानवडी परिसरात ‘स्कूलव्हॅन’मध्ये चालकाने २ अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणी ४५ वर्षीय नराधम चालकावर गुन्हा नोंदवण्यात आला. पुणे न्यायालयाने त्याला ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. चालक ६ वर्षांच्या मुलीसह तिच्या मैत्रिणीवर गेल्या ४ दिवसांपासून चालत्या गाडीत लैंगिक अत्याचार करत होता.
आरोपी नामांकित शाळेतील विद्यार्थ्यांना ‘व्हॅन’मधून शाळेत सोडतो. तो पीडित मुलींना त्याच्या जवळील पुढच्या आसनावर बसवून त्यांच्याशी अश्लील चाळे करत होता. याची वाच्यता कुठे करू नये, यासाठी त्याने त्यांना धमकीही दिली. अल्पवयीन मुलीने घरी आईला याविषयी सांगितल्यावर हा प्रकार उघडकीस आला.
संपादकीय भूमिका :
|