भाजपकडून तृणमूल काँग्रेसवर आक्रमणाचा आरोप
बंगालमधील कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा उडाले असतांनाही त्याविषयी मौन बाळगणारे सर्वपक्षीय नेते, निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी ! केंद्रातील भाजप सरकारने याची गंभीर नोंद घेऊन याविषयी कृती करणे आवश्यक !
बशीरहाट (बंगाल) – येथे भाजपचे नेते फिरोज कमाल गाझी यांच्यावर गावठी बॉम्बद्वारे आक्रमण करण्यात आले. ते त्यांच्या वाहनातून जात असतांना हे आक्रमण करण्यात आले. यात ते घायाळ झाल्याने त्यांना उपचारार्थ रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. त्यांनी नुकताच तृणमूल काँग्रेसचा त्याग करून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपने या आक्रमणासाठी तृणमूल काँग्रेसला उत्तरदायी ठरवले आहे.
In West Bengal, political violence has become synonymous with TMC. BJP leader Shri Firoz Kamal Gaji (Babu Master) was attacked by TMC goons this evening. But Mamata Banerjee, who is also the home minister of Bengal, will maintain radio silence on this, like every other incidence. pic.twitter.com/RWgs04CnNY
— Amit Malviya (@amitmalviya) February 13, 2021