चंद्रपूर – जिल्ह्यातील कोरपना येथील अल्पवयीन मुलीच्या बलात्कार प्रकरणात आरोपी अमोल लोडे याला अकोल्यातून अटक करण्यात आली आहे. आरोपी अमोल लोडे हा युवक काँग्रेसचा कोरपना शहर अध्यक्ष आहे. (अशांची अध्यक्षपदावरून हकालपट्टी करायला हवी ! – संपादक) तो कॉन्व्हेंट शाळेत शिक्षकही आहे. त्याने १२ वर्षांच्या विद्यार्थिनीवर अत्याचार केला. उन्हाळ्यात शिकवणीवर्ग घेण्याचे कारण देत त्याने मुलीला शाळेत बोलावून तिच्यावर अत्याचार केला, तसेच ‘तुझ्या आई-वडिलांना जिवानिशी मारून टाकीन’, अशी धमकी आरोपीने पीडित मुलीला दिली; मात्र पीडित मुलीने तिच्या मैत्रिणीकडे याविषयी सांगितल्याने हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी पोलिसांनी पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
संपादकीय भूमिकाबलात्कारी पदाधिकारी ठेवणार्या काँग्रेसला येत्या निवडणुकीत धडा शिकवा ! शिक्षण क्षेत्राला कलंक ठरणार्या अशा शिक्षकांना बडतर्फच करायला हवे ! |