फ्रान्समध्ये नाताळाच्या मेजवानीला गेल्याने धर्मांध तरुणांकडून मुसलमान मित्राला मारहाण

भारतातील हिंदूंना सर्वधर्मसमभावाचे आणि धर्मनिरपेक्षेतेचे डोस पाजण्यात आल्याचे हिंदूंना सर्व धर्म सारखेच वाटतात; मात्र जगातील धर्मांधांना असे वाटत नाही, याचे हे आणखी एक उदाहरण !

गृहमंत्री गेराल्ड डारमनिन

बेलफोर्ट (फ्रान्स) – नाताळानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या मेजवानीमध्ये येथे एका मुसलमान मुलगा सहभागी झाल्याने त्याच्याच ५ धर्मांध मित्रांनी त्याला अमानुष मारहाण केली. यात हा मुलगा गंभीररित्या घायाळ झाला. या मुलाची आई मुसलमान आहे, तर सावत्र वडील मुसलमान नाहीत, यामुळे ही मारहाण करण्यात आली. या मुलाचे आई-वडील दोघेही फ्रान्समध्ये पोलीसदलातच काम करतात. फ्रान्सचे गृहमंत्री गेराल्ड डारमनिन यांनी या घटनेसंदर्भात माहिती दिली. त्यांनी या मारहाणीला ‘वंशभेद करणारे आक्रमण’ असे म्हटले आहे. ‘असे कट्टरतावादी हे फ्रान्समधील विभाजनकारी शक्तींचे प्रतीक असून ते फ्रान्समधील मूल्यांना हानी पोचवत आहेत’, असे गृहमंत्र्यांनी म्हटले आहे.

‘मुसलमानांनी नाताळ साजरा करू नये, असे आम्हाला वाटते; म्हणून आम्ही त्याला मारहाण केली’, असे मुख्य आरोपीने पोलिसांना सांगितले. तसेच ‘या मुलाने नाताळाच्या मेजवानीचे छायाचित्र सामाजिक माध्यमांवर अपलोड केल्याने आणि त्यात तो  खाद्यपदार्थांचा अस्वाद घेत आहे हे पाहून आमचा संताप झाला’, असेही या आरोपींनी सांगितले.