अमेरिकेत पाद्रयाकडून चर्चच्या शिबिरामध्ये तत्कालीन लहान मुलाचा छळ

पाद्रयांच्या अशा अमानुष कृत्यांकडे पहाता परदेशात त्यांच्यावरील ख्रिस्त्यांचा विश्‍वास उडालेला आहे, हे भारतियांनी लक्षात घेतले पाहिजे !

वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेतील पाद्री आणि राजकारणी रेव्ह. राफैल वार्नोक यांच्याकडून संचालित चर्चच्या शिबिरामध्ये वर्ष २००२ मध्ये एका १२ वर्षांच्या मुलाचा छळ करण्यात आल्याची घटना आता उघड झाली आहे.

आता मोठा झालेल्या या तरुणाने एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीमध्ये वार्नोक आणि त्यांच्या चर्च विषयी अनेक माहिती उघड केली आहे.

या मुलाला त्या वेळी अनेक वेळा चर्चच्या शिबिराच्या बाहेर रात्रभर ठेवण्यात आले होते. त्याच्यावर मूत्र फेकण्यात आले होते.