निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इलेक्ट्रॉनिक आणि सामाजिक माध्यमांतील राजकीय विज्ञापने प्रामाणित करून घेणे अनिवार्य !

यामध्ये दूरचित्रवाहिन्या, रेडिओ, चित्रपटगृहे, ई-वृत्तपत्रे आणि इतर डिजिटल माध्यमे अशा विविध माध्यमांसाठी  द्यावयाच्या विज्ञापनांचा समावेश आहे. 

फटाक्यांद्वारे होणारी हिंदु देवता आणि राष्ट्रपुरुष यांची विटंबना रोखा !

हिंदूंनी, हलाल प्रमाणित आणि चिनी वस्तू, तसेच देवतांचे विडंबन करणारे फटाके यांपासून मुक्ती देणारी दिवाळी साजरी करावी !

कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीचे १० उमेदवार निवडून आणू ! – राजेश क्षीरसागर, शिवसेना

गेल्या ५ वर्षांत कोल्हापूर शहरात मोठ्या प्रमाणात विकासकामे केली आहेत. राज्यात महायुतीची घौडदौड चालू असून कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीचे १० उमेदवार निवडून आणू, असे प्रतिपादन श्री. राजेश क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत केले.

Jaishankar’s Warning  : ‘२६/११’सारखी आक्रमणे भारत आता सहन करणार नाही !

आक्रमणे झाल्यानंतर कारवाई करण्याचा विचार करण्याऐवजी भारतावर यापुढे आक्रमण करण्याचेच कुणाचे धाडस होणार नाही, असा वचक निर्माण केला पाहिजे !

Day 2 Of ‘The Jaipur Dialogues’ : जागतिक पातळीवर भारताला मागे ढकलण्याचे षड्यंत्र !

तीन दिवसीय ‘द जयपूर डायलॉग्ज’च्या परिषदेतील दुसर्‍या दिवशी देश-विदेशातील विचारवंत, राष्ट्रवादी आणि नामवंत वक्ते यांनी व्यक्त केलेल्या मतांचा संक्षिप्त वृत्तांत . . .

राष्ट्रीय संरक्षणासाठी हलाल खरेदी न करण्यासाठी विविध ठिकाणी शपथ आणि जागृती आंदोलने !

कर्नाटक राज्यातील ‘हलालमुक्त दीपावली अभियान’ला प्रारंभ ! शिवमोग्गा (कर्नाटक) – काही वर्षांपासून भारतात हेतूपुरस्सर हलाल उत्पादनांसाठी मागणी केली जात आहे, त्यामुळे हिंदु व्यापार्‍यांना व्यापार करण्यासाठी हलाल प्रमाणपत्र घेणे आवश्यक झाले आहे. पूर्वी हलाल संकल्पना केवळ मांसाचे उत्पादन आणि इस्लामी  देशांमध्ये निर्यात करण्यापुरती मर्यादित होती; परंतु आता भारतात पीठ, साखर, चॉकलेट, बिस्किटे इतर दैनिक उत्पादने, औषधे, … Read more

illegal immigration in America : अमेरिकेत अवैध प्रवेश करणार्‍या ९० सहस्र ४१५ भारतियांना अटक !

गेल्या वर्षी अमेरिकेत अवैधरित्या प्रवेश केल्याच्या प्रकरणी ९० सहस्र ४१५ भारतियांना अटक करण्यात आली. ‘यूएस कस्टम्स अँड बॉर्डर प्रोटेक्शन’ (सीबीपी) विभागाने ऑक्टोबर २०२३ ते सप्टेंबर २०२४ या कालावधीत अवैधपणे देशात प्रवेश करणार्‍या लोकांची आकडेवारी घोषित केली आहे.

Bandra Railway Station : वांद्रे (मुंबई) येथे गोरखपूर अंत्योदय एक्सप्रेसमध्ये चढतांना उत्तर भारतीय प्रवाशांची प्रचंड चेंगराचेंगरी

वांद्रे येथे २७ ऑक्टोबर या दिवशी पहाटे ५ वाजता गोरखपूर अंत्योदय एक्सप्रेसमध्ये चढतांना उत्तर भारतीय प्रवाशांची प्रचंड चेंगराचेंगरी होऊन ९ जण घायाळ, तर २ जण गंभीर घायाळ झाले. ही गाडी पूर्ण अनारक्षित असते.

S Jaishankar On Canada : कॅनडा सरकारला भारताने ‘जशास तसे’ प्रत्युत्तर दिले ! – परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर

जेव्हा भारताचे राष्ट्रहित, अखंडता किंवा सार्वभौमत्त्व यांचा प्रश्‍न येतो, तेव्हा भारत कठोर पावले उचलतो, अशी माहिती भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी दिली.

Marathi Bhasha Sanchanalay : सुधारित भारतीय कायद्यांचा अनुवाद करणारे महाराष्ट्र ठरले पहिले राज्य !

देशातील सर्वसामान्य नागरिकांना हे सुधारित कायदे समजावेत, यासाठी प्रादेशिक भाषांमध्ये त्यांचा अनुवाद केला जातो. संबंधित राज्यांच्या भाषा विभागाकडून हे काम केले जाते.