फटाक्यांद्वारे होणारी हिंदु देवता आणि राष्ट्रपुरुष यांची विटंबना रोखा !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पोलीस ठाणे आणि फटाके विक्रेते यांना निवेदन

फटाके विक्रेत्यांना निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ

कोल्हापूर – दीपावलीच्या निमित्ताने फटाक्यांवरील वेष्टनांवर हिंदूंच्या देवता आणि राष्ट्रपुरुष यांची चित्रे छापली जातात. या चित्रांद्वारे हिंदूंच्या देवता आणि राष्ट्रपुरुष यांची विटंबना रोखली जावी, तसेच अवैधपणे विक्री होत असलेल्या चिनी बनावटीच्या फटाक्यांवर बंदी घालावी या मागण्यांचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गांधीनगर पोलीस ठाणे, राजवाडा पोलीस ठाणे येथे, तसेच गांधीनगर येथील फटाके विक्रेते यांना देण्यात आले.

राजवाडा पोलीस निरीक्षक झाडे यांना निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ

या वेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे कोल्हापूर जिल्हा सहसंयोजक श्री. अभिजित पाटील, हिंदू महासभेचे जिल्हाध्यक्ष श्री. राजू तोरस्कर, हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे श्री. आनंदराव पवळ आणि श्री. शरद माळी, हिंदुत्वनिष्ठ श्री. सुभाष सुर्वे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी आणि श्री. महेंद्र अहिरे यांसह अन्य उपस्थित होते.

गांधीनगर येथे पोलीस उपनिरीक्षक सावंत यांना निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ

संपादकीय भूमिका

  • हिंदूंनी, हलाल प्रमाणित आणि चिनी वस्तू, तसेच देवतांचे विडंबन करणारे फटाके यांपासून मुक्ती देणारी दिवाळी साजरी करावी !
  • असे निवेदन का द्यावे लागते ?