जिहादी आतंकवादी हाफीज सईद याला आणखी १५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा

हाफीज सईद याला यापूर्वीही शिक्षा झाली आहे; मात्र तो घरातच सर्व सुखे उपभोगत आहे. त्यामुळे त्याला अशा कितीही शिक्षा झाल्या तरी त्याच्यावर त्यांचा कोणताही परिणाम होणार नाही . अशी शिक्षा म्हणजे पाकची जगाच्या डोळ्यातील धूळफेक आहे !

कोरोनाच्या नवीन विषाणूच्या संसर्गाची भीती असूनही हणजूण येथे ‘रेव्ह पार्ट्यां’चे सर्रासपणे आयोजन !

कोरोनाच्या नवीन विषाणूच्या संसर्गाची आणि कोरोनाच्या दुसर्‍या लाटेची भीती असतांना हणजूण येथे नाताळची सुटी आणि ख्रिस्त्यांचे नवीन वर्ष यांच्या पार्श्‍वभूमीवर ‘रेव्ह पार्ट्यां’चे मोठ्या प्रमाणावर आयोजन करण्यात येत आहे.

आडेली गावच्या सरपंचांवरील अविश्‍वास ठराव संमत झालेली विशेष ग्रामसभा उच्च न्यायालयाकडून रहित

नियमबाह्य ग्रामसभा घेऊन संरपंचांना पदावरून हटवण्यामागे कुणाचे हितसंबंध गुंतलेले आहेत का, याचीही चौकशी होणे आवश्यक !

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावर बंदी घालण्यासाठी ट्विटरवर २ हॅशटॅग ट्रेंड

#BanPFI हा हॅशटॅग ट्रेंड पहिल्या, तर #PFIExposed चौथ्या क्रमांकावर !

चीनने क्षमा मागावी किंवा कारवाईसाठी सिद्ध व्हावे ! – अफगाणिस्तानची चेतावणी

फगाणिस्तानमध्ये हेरगिरी करणार्‍या चीनच्या १० हेरांना अटक करण्यात आली आहे. यातील दोघे जण ‘हक्कानी नेटवर्क’ या आतंकवादी संघटनेच्या संपर्कात होते.

चीनकडून मणिपूरमधील आतंकवाद्यांना शस्त्रपुरवठा आणि प्रशिक्षण

गुप्तचर विभागांनी दिलेल्या माहितीनुसार चीन ईशान्य भारतात विशेषतः मणिपूरमधील आतंकवादी संघटनांना मोठ्या प्रमाणात शस्त्रपुरवठा करत आहे. ४ आतंकवादी नेत्यांना ऑक्टोबरमध्ये चीनमध्ये प्रशिक्षणही देण्यात आले होते.

मुळदे येथील ॐ श्री नवनाथ श्रद्धास्थान येथे दत्तजयंती उत्सव

तालुक्यातील मुळदे येथील ॐ श्री नवनाथ श्रद्धास्थान, नवनाथ उपासक, प.पू. श्री बाळकृष्ण महादेव घडशी महाराज यांच्या तपोभूमीत दत्तजयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त २२ ते २८ डिसेंबर या कालावधीत प्रतिदिन ‘गुरुचरित्रा’चे पारायण होत आहे.

नववर्षांनिमित्त एकमेकांना भेटतांना हस्तांदोलन करण्याऐवजी ‘नमस्कार’ म्हणा ! – मायकल लोबो, बंदर कप्तान मंत्री

‘राज्यात कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी दिवसाची किंवा रात्रीची संचारबंदी लादली जाणार नाही; मात्र प्रत्येकाने कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सर्वतोपरी दक्षता घेणे आवश्यक आहे.

गोव्याची खरी ओळख जगभर पोचवणे आवश्यक ! – प.पू. सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी महाराज

गोव्याच्या इतिहासावर सखोल अभ्यास करून तो लोकाभिमुख करणे, ही काळाची आवश्यकता आहे. यासाठी सामाजिक क्षेत्रात कार्यरत संघटनांनी संघटित प्रयत्न केले पाहिजेत – प.पू. सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी महाराज

पोर्तुगिजांच्या सर्व खुणा हटवल्यास आणि कार्निव्हालसारखे उत्सव रहित केल्यासच खर्‍या अर्थाने गोवामुक्ती ठरेल ! – प्रा. सुभाष वेलिंगकर

पोर्तुगीज राजवटीच्या सर्व खुणा हटवून, शहरे यांची पोर्तुगीज नावे पालटून अन् पोर्तुगिजांचे कार्निव्हाल उत्सव रहित केल्यासच खर्‍या अर्थाने गोवामुक्ती ठरणार आहे.