पेठवडगाव (जिल्हा कोल्हापूर) – प्रभु श्रीरामचंद्र आणि स्वामी समर्थ यांच्यावर अश्लाघ्य वक्तव्य करणार्या ज्ञानेश महाराव यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम २९९ आणि ३०२ या अंतर्गत गुन्हा नोंद करा, या मागणीची तक्रार भाजप आध्यात्मिक आघाडीचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष श्री. मनोहर काटकर यांनी पेठवडगाव पोलीस ठाण्यात दिली आहे. या प्रसंगी सर्वश्री धनंजय गोंदकर, रमेश माळवदे, संतोष चौगुले, राजेंद्र जाधव, प्रमोद जगताप, गजेंद्र बुरुड, सौरभ शिंदे, सौ. सुप्रिया सचिन पाटील, डॉ. अभयसिंह यादव यांसह अन्य उपस्थित होते.
१५ सप्टेंबरला ज्ञानेश महाराव यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास जोडे मारा आंदोलन !ज्ञानेश महाराव यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ रविवार, १५ सप्टेंबर या दिवशी सकल हिंदु समाजाच्या वतीने सकाळी १० वाजता नगरपालिका चौक, पेठवडगाव येथे ज्ञानेश महाराव यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला ‘जोडे मारा’ आंदोलन करण्यात येणार आहे. अधिकाधिक हिंदूंनी या प्रसंगी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. |