कुडाळ – तालुक्यातील मुळदे येथील ॐ श्री नवनाथ श्रद्धास्थान, नवनाथ उपासक, प.पू. श्री बाळकृष्ण महादेव घडशी महाराज यांच्या तपोभूमीत दत्तजयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त २२ ते २८ डिसेंबर या कालावधीत प्रतिदिन ‘गुरुचरित्रा’चे पारायण होत आहे. २९ डिसेंबरला श्री दत्तजन्म सोहळ्यानिमित्त सकाळी ६ वाजता काकड आरती, सकाळी ९ ते ११ श्री सत्यदत्तपूजा, सकाळी ११ ते दुपारी १ ह.भ.प. सामंतबुवा यांचे कीर्तन, दुपारी १ ते २ श्री. एकनाथ ढवळे यांचे ‘गुरुचरित्र’ वाचन, दुपारी ३.३० ते सायंकाळी ६ ह.भ.प. वासुदेव कृष्णा सडवेलकर बुवा, आंदुर्ले यांचे कीर्तन, सायंकाळी ६ वाजता दत्तजन्म सोहळा, रात्री ७ ते ८ निवजेकर प्रासादिक भजनी मंडळ, निवजे (पिंगुळकर बुवा) यांचे भजन, ८ ते ९ पालखी प्रदक्षिणा, ९ ते रात्री ११ हरिपाठ, महाप्रसाद आणि भजने, असे कार्यक्रम होणार आहेत. कोरोनाविषयीचे नियम पाळण्यात येणार असल्याने भाविकांनी कोरोनाचे नियम पाळून कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन प.पू. घडशी महाराज यांनी केले आहे.