|
मंड्या (कर्नाटक) – येथील श्री गणेश विसर्जन मिरवणुकीवर केलेल्या आक्रमणाच्या प्रकरणी पोलीस निरीक्षक अशोक कुमार यांच्यावर कर्तव्यात निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवत त्यांना निलंबित करण्यात आले आहे. पोलीस महानिरीक्षकांनी हा आदेश दिला. मंड्या (कर्नाटक) येथील नागमंगल येथे श्री गणेशमूर्तीची विसर्जन मिरवणूक एका दर्ग्यासमोर येताच धर्मांध मुसलमांनी ‘अल्लाहू अकबर’च्या घोषणा देत त्यावर पोलिसांसमोरच पेट्रोलबाँबद्वारे आक्रमण केले. त्यांनी मिरवणुकीवर दगड आणि काचेच्या बाटल्या फेकून मारल्या, तसेच हिंदूंसमोर तलवारीही झळकावल्या.
आतापर्यंत ५२ जणांना अटक !
नागमंगल येथे झालेल्या दंगलीप्रकरणी आतापर्यंत पोलिसांनी १५० आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवला असून २३ हिंदू, तर ३० मुसलमान, अशा एकूण ५३ जणांना अटक केली आहे, अशी माहिती मंड्या पोलीस अधीक्षक मल्लिकार्जुन यांनी पत्रकारांना दिली. ते म्हणाले की, नागमंगलमध्ये सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. दुकानदारांनी दुकाने उघडली आहेत. परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. मोठ्या संख्येने पोलीस तैनात करण्यात आले आहेत. कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी खबरदारी घेतली आहे. अटक केलेल्या ५३ जणांना न्यायालयात उपस्थित केले असता, न्यायालयाने त्यांना २५ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.
मशीद हे दंगल घडवण्याचे केंद्र आहे का ? – प्रमोद मुतालिक
श्रीराम सेनेचे संस्थापक प्रमोद मुतालिक म्हणाले, ‘‘नागमंगलमध्ये उपद्रवींनी विसर्जन मिरवणुकीवर दगड, चप्पल आणि पेट्रोल बाँब फेकले आहेत. मशीद हे दंगल घडवण्याचे केंद्र आहे का? मशिदीसमोरून गणेश मिरवणूक जायला नको का ? ही पूर्वनियोजित दंगल आहे, पोलीसांना याची माहिती कशी नाही ?’’
काँग्रेस सरकार कर्नाटकला पाकिस्तान बनवत आहे ! – केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशीकेंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले, ‘‘श्री गणेशमूर्तीच्या विसर्जन मिरवणुकीवर झालेल्या आक्रमणाचा मी तीव्र निषेध करतो. मशिदीजवळून श्री गणेशमूर्तीच्या विसर्जन मिरवणूक नेऊ नये, असा कुठला कायदा आहे का ? काँग्रेस सरकार राजकीय तुष्टीकरणासाठी कर्नाटकला पाकिस्तान बनवत आहे. काँग्रेसला हिंदु सणांविषयी इतका राग का आहे? काँग्रेस सरकारने केवळ मतपेटीच्या राजकारणाचा विचार न करता उन्मादी शक्तींना रोखायला हवे. काँग्रेसच्या हिंदुविरोधी धोरणांमुळेच अशा प्रकारच्या दंगली आणि घटनांचा उद्रेक होत आहे. नागमंगल येथील घटनेसाठी राज्यातील काँग्रेस सरकारच उत्तरदायी आहे.’’ |
काँग्रेसच्या धर्मांध नेत्याने दंगलीचे खापर हिंदूंवर फोडले !हिंदूंच्या विरोधात कशी कथानके रचली जात आहेत, हेच यातून दिसून येते. असे धर्मांध मंत्री सत्तेवर असल्यास त्या राज्यातील हिंदू सुरक्षित रहातील का ? हिंदूंनी या मंत्र्यांना वैधपणे खडसावणे आवश्यक ! बेंगळुरू – नागमंगल येथील श्री गणेशमूर्ती विसर्जनाच्या वेळी झालेल्या धार्मिक दंगलीच्या वेळी मंत्री जमीर अहमद यांनी दंगलीचे खापर हिंदूंवर फोडले आहे. ते म्हणाले, ‘‘दर्ग्याच्या जवळून मिरवणूक निघाली, त्या वेळी नमाजपठणाची वेळ झाल्याने १० मिनिटे त्यांना (हिंदूंना) थांबवण्यास सांगण्यात आले; मात्र त्यांनी हे मान्य न केल्याने गदारोळ झाला. राजकीय नेत्यांच्या वक्तव्यामुळे हे सूत्र गाजत आहे. ‘दंगल व्हायला हवी’, असे मी म्हटले नव्हते. असा गदारोळ होऊ नये, यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. ‘काँग्रेसची सत्ता असतांनाही असा गदारोळ होतो’, असे म्हणणे चुकीचे आहे. भाजप असतांना दंगली झाल्याच नाहीत का ?’’ |
संपादकीय भूमिका
|