सम्राट भगत आणि अन्य नागरिक यांनी ईदच्या निमित्ताने काणकोण परिसरात जुलूस काढण्यास विरोध केल्याचे प्रकरण
काणकोण, १३ सप्टेंबर (वार्ता.) – येथील सम्राट भगत आणि अन्य नागरिक यांनी ईदच्या निमित्ताने काणकोण परिसरात जुलूस काढण्यास विरोध केला आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यासमवेत सम्राट भगत आणि अन्य नागरिक यांच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत काणकोण परिसरात जुलूस काढण्यास अनुमती नाकारण्यात आली. या बैठकीला तालुक्याचे उपजिल्हाधिकारी आणि पोलीस अधिकारी यांची उपस्थिती होती.
तत्पूर्वी सम्राट भगत यांनी शासन आणि पोलीस यांना काणकोण परिसरात जुलूस काढण्यास अनुमती न देण्याची मागणी करणारे निवेदन दिले होते. काणकोण पसिरात जुलूस काढण्यास पुढील कारणांमुळे विरोध दर्शवण्यात आला आहे.
१. काणकोण येथे ईदच्या निमित्ताने जुलूस काढण्याची परंपरा नाही. काणकोण येथे मुसलमानांची पूर्वीपासून ८ ते १० कुटुंबे रहातात आणि यापूर्वी कधीही काणकोण येथे जुलूस काढण्यात आलेला नाही.
२. गोव्याबाहेरील विशेषत: कुमठा, धारवाड, हुब्बळ्ळी, भटकळ आदी भागांतील, तसेच मडगाव परिसरातील मुसलमान सहस्रोंच्या संख्येने एकत्र येऊन काणकोण येथे जुलूस काढण्याच्या प्रयत्नात आहेत. येथे नवीन परंपरा चालू करण्याचा हा प्रयत्न आहे. लोकांमध्ये भयगंड निर्माण करण्याचा हा प्रयत्न असू शकतो. समाजात फूट पाडून राजकीय लाभ उठवण्यासाठी जुलूसचे आयोजन करण्यात येत आहे. यामुळे काणकोण परिसरातील शांती आणि सौहार्दता बिघडण्याची शक्यता आहे. हा प्रकार काणकोणवासीय सहन करणार नाहीत.
३. काणकोण महालात श्री मल्लिकार्जुनदेवाच्या कृपाशीर्वादाने सहस्रो वर्षांपासून रूढी परंपरा चालून आलेल्या आहेत. काणकोण महालात श्री मल्लिकार्जुनदेवाच्या प्रसाद कौलाविना काही करण्याचा प्रयत्न हा अधर्म आहे.
४. येथे ५ सहस्र देव वाटा आहेत. ज्या देवाच्या वाटा मानल्या जातात, त्या वाटा बाटवल्या जाऊ नयेत.
५. ईद साजरी करण्यास आमचा विरोध नाही. त्यांनी तो उत्सव मशिदीत आनंदाने साजरा करावा.
संपादकीय भूमिकासर्वत्रच्या नागरिकांनी अशी सतर्कता बाळगल्यास गोव्यात शांतता नांदेल ! |