पुणे येथे १६९ श्री गणेशमूर्तींचे कृत्रिम हौदांमध्ये, १ सहस्र ५३२ श्री गणेशमूर्तींचे लोखंडी टाक्यांमध्ये विसर्जन, तर ३६० मूर्तींचे मूर्तीदान !
पुणे / पिंपरी-चिंचवड – येथे ५ दिवसांच्या श्री गणेशमूर्तींना ११ सप्टेंबर या दिवशी भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथे महापालिकेने बांधलेल्या हौदांमध्ये सहस्रो श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. पुणे शहरात ११ सप्टेंबरला रात्री ८ पर्यंत बांधलेल्या हौदांत विसर्जन झालेल्या श्री गणेशमूर्तींची संख्या १६९, लोखंडी टाक्यांमध्ये विसर्जन केलेल्या श्री गणेशमूर्तींची संख्या १ सहस्र ५३२, संकलित मूर्तींची संख्या ३६० आहे, अशी माहिती पुणे महापालिकेच्या घनकचरा विभागाचे उपायुक्त संदीप कदम यांनी दिली.
या वर्षी पुरेसा पाऊस पडल्याने पाणी भरपूर असूनही विसर्जनासाठी प्रतिबंध !
या वर्षी पुरेसा पाऊस पडल्याने पाणी भरपूर असूनही विसर्जनासाठी प्रतिबंध करण्यात आला आहे. ‘बिर्ला हॉस्पिटल’ जवळील घाट येथे १२ महिने थेट ‘ड्रेनेज लाईन’ नदीत सोडली आहे. सर्व गणेशभक्तांच्या धार्मिक भावनांची नोंद न करता विसर्जन घाट पूर्ण बंद करण्यात आला आहे. बहुतेक सर्व घाट अशा प्रकारे बंद करण्यात आले आहेत. बिर्ला हॉस्पिटल जवळील घाटावरील मूर्ती संकलित करण्यात आल्या आहेत. (ड्रेनेजच्या अस्वच्छ पाण्यामुळे प्रदूषण होत नाही, केवळ श्री गणेशमूर्ती विसर्जन केल्याने प्रदूषण होते का ? पर्यावरण रक्षणाच्या नावाखाली नदीमध्ये पुरेसे पाणी असूनही विसर्जन घाट पूर्ण बंद करणे, ही हिंदूंच्या धार्मिक स्वातंत्र्याची गळचेपी नव्हे का ? – संपादक)
(म्हणे) ‘श्री गणेशमूर्तींचे विसर्जन कृत्रिम हौदांमध्ये करावे !’ – ममता राठोड, उपमुख्याधिकारी
विविध ठिकाणी मूर्तीदान केंद्रे, विसर्जन कुंड (कृत्रिम हौद), तसेच अमोनियम बायकार्बोनेट पावडरचे विनामूल्य वाटप !
तळेगाव दाभाडे (पुणे) – पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी तळेगाव दाभाडे नगर परिषदेकडून विविध ठिकाणी मूर्तीदान केंद्रे, विसर्जन कुंड (कृत्रिम हौद) सिद्ध करण्यात आले आहेत, तसेच ज्या गणेशभक्तांना स्वतःच्या घरीच मूर्तीचे विसर्जन करायचे आहे. त्यांच्यासाठी २ ठिकाणी अमोनियम बायकार्बोनेट पावडरचे विनामूल्य वाटप करण्यात येत आहे. श्री गणेशोत्सव काळात निर्माण होणारे निर्माल्य संकलन करण्यासाठी नगर परिषदेच्या आरोग्य विभागाद्वारे प्रतिदिन ट्रॅक्टरद्वारे निर्माल्य कलश फिरवण्यात येत आहे, तसेच मूर्तीदान केंद्रे आणि विसर्जन कुंड या ठिकाणीही निर्माल्य कलश ठेवण्यात आले आहेत. शहरातील नागरिक आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे यांनी निर्माल्य इतरत्र न टाकता निर्माल्य कलशात टाकावे, असे आवाहन नगर परिषदेच्या उपमुख्याधिकारी ममता राठोड यांनी केले आहे. (बकरी ईदच्या वेळी लाखो बकर्यांची कत्तल केली जाते. त्यांचे रक्त नदीत मिसळते. काही शहरात तर काही दिवस पिण्याचे पाणीही लालसर मिळते. तेव्हा नदीच्या प्रदूषणात वाढ होत नाही का ?, तसेच नदीमध्ये पुरेसे पाणी असूनही तिथे मूर्ती विसर्जन करण्यास मज्जाव करून गणेशभक्तांना मूर्ती कृत्रिम हौदातच विसर्जित करा, हा अट्टहास का केला जात आहे. ही हिंदूंच्या धार्मिक स्वातंत्र्याची गळचेपी नव्हे का ? – संपादक)
गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्यासाठी आणि जलप्रदूषण रोखण्याच्या अनुषंगाने नागरिकांनी श्री गणेशमूर्तीचे विसर्जन तलाव, विहीर, नदी आणि इतर नैसर्गिक जलस्रोतांमध्ये न करता नगर परिषदेद्वारे उभारण्यात आलेल्या केंद्रांवर मूर्तीदान करावे अथवा कृत्रिम हौदात मूर्तींचे विसर्जन करण्याचे आवाहन तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे प्रभारी मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम यांनी केले.
संपादकीय भूमिकासमाजाला अशास्त्रीय पद्धतीने मूर्ती विसर्जन करण्यास भाग पाडणारे प्रशासन हिंदुहित कसे जपणार ? |