पोलिसांकडून ॲट्रॉसिटी आणि बलात्कार यांचा गुन्हा नोंद !
सांगली, १३ सप्टेंबर (वार्ता.) – येथील एका हिंदु पीडित तरुणीने प्रविष्ट केलेल्या खटल्यातून जामिनावर सुटल्यानंतर धर्मांध संशयित आरोपी मोईन सिराज नदाफ (रा. कवठेएकंद, तालुका तासगाव) याने पीडित तरुणीवर पुन्हा बलात्कार केल्याची गंभीर घटना उघड झाली आहे. त्याने अश्लील छायाचित्रे आणि व्हिडिओ प्रसारित करण्याची धमकी दिली. या प्रकरणी पीडित तरुणीने सांगली शहर पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी मोईन सिराज नदाफ याच्याविरुद्ध बलात्कार, विनयभंग आणि ॲट्रॉसिटी कायद्यातील प्रावधानांनुसार गुन्हा नोंद केला आहे.
मिरज तालुक्यातील एका गावातील पीडित तरुणीने संशयित मोईन नदाफ याने अत्याचार केल्याविषयी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्या गुन्ह्यातून जामिनावर सुटल्यानंतर धर्मांध मोईन नदाफ याने पुन्हा पीडितेच्या हालचालींवर लक्ष ठेवले. पीडित तरुणी मार्च २०२४ मध्ये खरेदीच्या निमित्ताने सांगली येथे आल्याचे समजताच मोईन याने तिची भेट घेतली. ‘तू माझ्यावर गुन्हा का नोंद केला आहेस ?’, असा जाब विचारला त्या वेळी अश्लील छायाचित्रे आणि व्हिडिओ दाखवून ते प्रसारित करण्याची धमकी देत बलात्कार केला.
संपादकीय भूमिका
|
हिंदू युवतींनी अबला न होता दुर्गेचे रूप धारण करावे ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
आषाढी वारीत नियमबाह्य आणि मनमानी भाडे आकारणीवर कडक कारवाई !
वटपौर्णिमेनिमित्त ठाणे जिल्ह्यातील श्री मलंगगडावर मलंगनाथांच्या समाधीची भक्तीभावाने आरती !
पावसाचा जोर अल्प असल्याने धरणातील पाणीसाठा गतवर्षीच्या तुलतेन अल्पच
आरोपींच्या कोठडीत ३ जुलैपर्यंत वाढ !
शिक्षणमंत्र्यांच्या त्यागपत्राच्या मागणीसाठी विरोधकांचा विधान परिषदेत गदारोळ !