कोल्हापूर – शरद पवारांचा राजकीय अजेंडा नेहमी हिंदु धर्मावर टीका करणे जाती-जातींमध्ये फूट पाडून राजकारण करणे यावरच चालतो. अन्य धर्मावर काही बोलण्याची हिंमत यांच्यामध्ये नाही. त्यामुळे शरद पवारांच्या मूक संमतीने ज्ञानेश महारावांनी हिंदु धर्माच्या विरोधात गरळ ओकली. तरी ज्ञानेश महाराव यांना तात्काळ अटक करावी, अशी मागणी भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव यांनी केली. भाजपच्या वतीने मिरजकर तिकटी येथे निदर्शने करण्यात आली, त्या प्रसंगी ते बोलत होते.
या प्रसंगी जिल्हाध्यक्ष विजय जाधव, हेमंत आराध्ये, भाजपचे आध्यात्मिक आघाडी जिल्हाध्यक्ष संजय जासूद, सरचिटणीस डॉ. राजवर्धन, युवा मोर्चाचे अध्यक्ष गिरीश साळोखे, विराज चिखलीकर, आशिष कपडेकर यांसह अन्य उपस्थित होते.