अफगाणिस्तानकडून चीनचे १० हेर अटकेत !
नवी देहली – अफगाणिस्तानमध्ये हेरगिरी करणार्या चीनच्या १० हेरांना अटक करण्यात आली आहे. यातील दोघे जण ‘हक्कानी नेटवर्क’ या आतंकवादी संघटनेच्या संपर्कात होते. चीनने अफगाणिस्तानवर दबाव आणून या हेरांना सोडवण्याचा प्रयत्न केला; मात्र अफगाणिस्ताने त्याला भीक घातली नाही. उलट अफगणिस्तानने चीनला ‘क्षमा मागा किंवा कारवाईसाठी सिद्ध व्हा’, अशी चेतावणी दिली.
Afghanistan arrests 10 Chinese citizens on charges of espionage, asks China to apologisehttps://t.co/q4C3bnQ7uk
— OpIndia.com (@OpIndia_com) December 25, 2020
अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ घनी यांनी याचे गांभीर्य ओळखून हे प्रकरण उपराष्ट्रपती अमरुल्ला सेलीह यांच्याकडे सोपवले आहे. ते पूर्वी गुप्तचर विभागाचे प्रमुख होते. त्यांनी चीनच्या राजदूतांची भेट घेऊन याविषयीची माहिती दिली, तसेच ‘या प्रकरणी चीन जाहीररित्या क्षमा मागत असेल, तर अफगाणिस्तान त्यांना क्षमा करू शकतो. असे न केल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल’, असे त्यांना सांगितले.