पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावर बंदी घालण्यासाठी ट्विटरवर २ हॅशटॅग ट्रेंड

#BanPFI हा हॅशटॅग ट्रेंड पहिल्या, तर #PFIExposed चौथ्या क्रमांकावर !

मुंबई – नागरिकत्व सुधारणा कायद्याचा विरोध करतांना देहली आणि उत्तरप्रदेश येथे धर्मांधांनी केलेल्या दंगलीमध्ये ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ या जिहादी संघटनेचा हात असल्याचे समोर आल्यानंतर उत्तरप्रदेशच्या पोलीस महासंचालकांनी राज्य सरकारला या संघटनेवर बंदी घालण्याची शिफारस केली आहे. त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी ‘तिच्यावर बंदी घालण्यात येईल’, असे घोषित केले आहे. या पार्श्‍वभूमीवर धर्माभिमान्यांकडून २५ डिसेंबर या दिवशी ट्विटरवर #BanPFI हा हॅशटॅग ट्रेंड करण्यात आला होता. तो राष्ट्रीय ट्रेंडमध्ये पहिल्या क्रमांकावर होता. यावर ६० सहस्रांहून अधिक ट्वीट्स करण्यात आले. तसेच #PFIExposed हासुद्धा ट्रेंड करण्यात आला होता आणि तो चौथ्या क्रमांकावर होता. (पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाकडून होणार्‍या राष्ट्र आणि समाज विघातक कारवाया पहाता केंद्र सरकारने आतापर्यंत यावर बंदी घालणे आवश्यक होते, असेच राष्ट्रप्रेमींना वाटते ! – संपादक)